Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns saam tv
देश विदेश

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीमुळं तरुणाई आक्रमक झाली असून, हिंसक निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनामुळं नेपाळमध्ये सत्तापालट झाला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते देश सोडून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

  • नेपाळमध्ये सत्तापालट, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा

  • आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलक संसदेत घुसले

  • ओली यांच्या राजीनाम्यानंतर आज संध्याकाळपर्यंत नव्या पंतप्रधानांची घोषणा होण्याची शक्यता

नेपाळमध्ये सत्तापालट झाला आहे. पंतप्रधान केपी ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा आज, संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे आंदोलक अधिक आक्रमक झाले असून, संसद भवन पेटवून दिले.

सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनांमुळे देशात हिंसक निदर्शने झाली. या निदर्शनांदरम्यान काठमांडूमध्ये २० जणांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले. या परिस्थितीमुळे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला. शर्मा दुबईला जाणार असल्याचे वृत्त आहे. तसा दावा तेथील माध्यमांनी केला आहे.

नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने सोमवारी तरुणांनी काठमांडूमध्ये तीव्र निदर्शने केली. या आंदोलनांदरम्यान पोलिसांनी पाण्याचा मारा, अश्रूधूर आणि रबर गोळ्यांचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यामुळे हिंसाचार वाढला आणि २० जणांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक जखमी झाले.

काठमांडूमधील बानेश्वर परिसरात लष्कराला तैनात करावे लागले. या घटनेनंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली, परंतु तरुणांनी मंगळवारी देखील आंदोलने सुरू ठेवली.

आंदोलक संसदेत घुसले

तत्पूर्वी, नेपाळ संसदेत आक्रमक झालेले आंदोलक घुसले. त्यांनी सैन्याकडून शस्त्रे हिसकावून घेतली. दुसरीकडे काठमांडू विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शहरातील परिस्थिती चिघळली आहे.

आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. संतापलेले आंदोलक संसद भवनात घुसले. त्यांनी अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना पकडून रस्त्यावर आणले. तसेच त्यांना मारहाण केल्याचे वृत्त समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का! निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

SCROLL FOR NEXT