nepal news : Saam tv
देश विदेश

माजी पंतप्रधान आणि माजी गृहमंत्र्यांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

nepal news : नेपाळच्या माजी पंतप्रधान आणि माजी गृहमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक

माजी गृहमंत्री रमेश लेखक यांच्यावरही अटकेची कारवाई

बालेन शाह यांच्या कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाने खळबळ

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक करण्यात आली आहे. बालेन शाह यांनी पंतप्रधान होताच मोठी कारवाई केली आहे. शाह यांनी सत्ता स्थापन करताच विरोधकांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. पंतप्रधान बालेन शाह यांनी कॅबिनेट बैठकीत माजी पंतप्रधान ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. दोघांना Gen-Z आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघांना अटक झाल्याने नेपाळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी पंतप्रधान आणि माजी गृहमंत्र्यांना अटक केल्याने नेपाळचं राजकारण तापलं आहे. बालेन शाह यांनी सत्तेत विराजमान होताच कठोर पावले उचणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार कारवाईचा धडाका सुरू केला आहे. बालेन शाह सरकारने आंदोलनात झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणात माजी पंतप्रधानांना अटक केली आहे. बालेन शाह यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीत तपासाचा अहवाल सादर करण्यात आला होता.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर ओली सरकारने गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याच आधारावर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार ओली आणि लेखक यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. या दोन्ही नेत्यांना तुरुंगात धाडण्यात आलं आहे.

तपासणी आयोगाच्या रिपोर्टमध्ये पोलीस, सशस्त्र बल आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. परंतु बालेन शाह सरकारने आतापर्यंत त्यांच्याविरोधात थेट कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांच्या भूमिकेचा तपास करण्यासाठी सरकारने एका आयोगाची स्थापना केली आहे. त्या आयोगाच्या अहवालानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तपासात दोषी आढळल्यास शिक्षा देणार असल्याचेही शाह सरकारने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT