Nanded : नाशिकनंतर नांदेड हादरलं! विधवा महिलेवर महाराजाचा अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवले अन्...

Nanded Harigiri Dattagiri Maharaj News : नांदेडमध्ये लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू महाराजाला अटक करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात अशा घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
Nanded : नाशिकनंतर नांदेड हादरलं! विधवा महिलेवर महाराजाचा अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवले अन्...
Nanded Harigiri Dattagiri Maharaj NewsSaam Tv
Published On
Summary
  • नांदेडमध्ये भोंदू बाबाचा गंभीर प्रकार उघड

  • लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेवर अत्याचार

  • पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक

  • अशोक खरात प्रकरणानंतर पुन्हा अशाच घटनेमुळे खळबळ

Nanded Women Rape By Harigiri Dattagiri Maharaj नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण ताज असताना आता नांदेडमध्ये देखील अजून एका भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भोंदू बाबाने विधवा महिलेला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केले. याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या महाराजाला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात कोणते नवीन धागे दोरे समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ पासून एक पीडित महीला दर गुरूवारी मठात जात होती. तिथेच तिची आणि हरीगीरी दत्तगीरी महराज याची ओळख झाली. तीने हरीगिरी दत्तगीरी महाराज याला गुरू केले होते. भोंदू महाराज सतत तिला फोन वरून संपर्क करायचा. १४ जुलै २०२५ रोजी स्वतःच्या वाढ दिवासाच्या निमित्ताने भोंदू महाराज महिलेच्या घरी गेला होता. त्याच दिवशी त्याने बळ जबरीने अत्याचार केले. महिलेला लग्नाचे अमिष दाखवत तीन वेळा अत्याचार केले. त्यानंतर महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता भोंदू बाबाने तिला नकार दिला.

Nanded : नाशिकनंतर नांदेड हादरलं! विधवा महिलेवर महाराजाचा अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवले अन्...
Kolhapur : कोल्हापूर विद्यापीठातील विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कॉलेजच्या वस्तीगृहातच घेतला गळफास

याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात ४० वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराज विरोधात तक्रार दाखल केली. महिलेने तक्रारीत म्हटले की, महाराजाने लग्नाचे अमिष दाखवत तीन वेळा अत्याचार केले. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात हरिगिरी दत्तगिरी महाराजावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. भोंदू बाबा कॅप्टन खरात चे प्रकरण गाजत असताना आणखी एका महाराजावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच महाराष्ट्रात नेमकं काय सुरु आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Nanded : नाशिकनंतर नांदेड हादरलं! विधवा महिलेवर महाराजाचा अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवले अन्...
Shocking : खाकीला काळिमा! गुन्हा दाखल करायला आलेल्या बलात्कार पीडितेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस दलात खळबळ

अशोक खरात प्रकरण नेमकं काय?

देवाच्या नावाचा खोटा मुखवटा लावून तसेच स्वतःला स्वयंघोषित कॅप्टन म्हणत अशोक खरातने महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर अत्याचार केले. याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत. याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणात अनेक मोठे मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com