कोल्हापुरात विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
सुसाईड नोटमध्ये भावनिक संदेश
कारण अद्याप अस्पष्ट, पोलिस तपास सुरू
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला
Kolhapur Shivaji University Student Ishita Sawant Sucide in Hostel कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका २३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून या नोटमध्ये आई वडिलांसाठी भावनिक संदेश लिहला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत असून मृत मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इशिता मधुसुदन सावंत असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. इशिता ही एम.ए. मानसशास्त्राच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास तिने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. इशिता विद्यापीठातील वसतिगृहाच्या ३० क्रमांकाच्या खोलीत इशिता चार सहकारी मुलींसोबत राहत होती. गुढीपाडव्याच्या सुटीनिमित्त इतर तिघी गावी गेल्याने ती खोलीत एकटीच होती.
रात्री उशिरापर्यंत ती बाहेर न आल्याने शेजारील मुलींना संशय आला. त्यांनी आत पाहिले असता इशिताने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिने आरडाओरडा केल्याने इशिताच्या रूमबाहेर गर्दी झाली. वसतिगृहमधील शीला सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने इशिताला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दरम्यान तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण किंवा मानसिक तणाव असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली. यामध्ये तिने “मिस यू डॅडी, मम्मी… मला माफ करा,” असे भावनिक शब्द लिहिलेले आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.