Parliament Winter Session 2023 Saam TV
देश विदेश

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, २ महत्वाचे विधेयक मांडणार; विरोधात सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Parliament Winter Session 2024: सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत.

Priya More

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळी ११ वाजता सभागृह सुरू होईल. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्यानं २६ नोव्हेंबरला संसदेत संविधान दिवस साजरा केला जाणार आहे. या अधिवेशनात महत्वाचे २ विधेयक मांडण्याची शक्यता आहे. संसदेत आज वक्फ विधेयक मांडलं जाणार आहे. सध्या हे विधेयक JPC कडे वर्ग करण्यात आलं आहे. JPC च्या अहवालानंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावरून घेरण्याची शक्यता आहे.

हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमधील विधानसभा निवडणुका आणि अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांनंतर सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम अधिवेशनावरही दिसून येणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिका आणि केनियाने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस या अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता आहे. यासोबतच मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा विरोधक सभागृहात उचलणार आहेत. जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर विरोधक या अधिवेशनात आक्रमक होणार आहेत. त्याचसोबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील एकतर्फी निकलानंतर EMV मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक होणार का? हे पाहणं महत्वाचं राहिल.

यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत अदानी आणि मणिपूर हिंसाचारच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे केली, त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता दिसत आहे. या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती, वन नेशन-वन इलेक्शन अशी १६ विधेयके आणण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. यामध्ये वक्फ, वन नेशन-वन इलेक्शन विधेयकाबाबत प्रमुख विरोधी पक्षांमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

SCROLL FOR NEXT