धक्कादायक ! पंतप्रधान मोदींच्याच सुरक्षा रक्षकाचं पाकीट गेलं चोरीला; दोघे अटकेत सुरज सावंत
देश विदेश

धक्कादायक ! पंतप्रधान मोदींच्याच सुरक्षा रक्षकाचं पाकीट गेलं चोरीला; दोघे अटकेत

मुंबईत पंतप्रधान मोदींचे रक्षण करता तैनात असणारा कमांडो रेल्वेतल्या पाकिट मारांचा बळी ठरला आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत कसलीही चूक होण्यास जागा नसते. कारण SPG कमांडोंचे अत्यंत हुशार आणि आश्वासक सैनिक त्यांच्या सुरक्षेत तैनात असतात. पण मुंबईत पंतप्रधान मोदींचे रक्षण करता तैनात असणारा कमांडो रेल्वेतल्या पाकिट मारांचा बळी ठरला आहे.

हे देखील पहा-

एसपीजी कमांडो सुभाष चंद्रा मुंबईच्या लोकलमधून विलेपार्ले ते महालक्ष्मी प्रवास करत असताना. चंद्रा यांचे पर्स भूरट्या चोरांनी मारले. या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

तपासादरम्यान, आरोपींनी चंद्रा याच्या पाकिटातील कार्डमधून १९ हजार रुपये काढल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांनी एक एक पुरावा जोडत आरोपी सुरवातीला राणु पांडे याला अटक केली. राणुच्या चौकशीत पाकीटातून चोरलेले पैसे तो स्वत:ला ठेवायचा आणि पाकिटातील बँकेचे कार्ड हैदर समसुद्दीन शेखला मिरारोड याला द्यायचा. हैदर वायफाय अँक्टिवर असलेल्या कार्डद्वारे पैसे उकळायचा. हैदर याने अशा प्रकारे अनेकांना लुबाडल्याचे प्रथामिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

SCROLL FOR NEXT