Narendra Modi at Ai action summit Saam Tv
देश विदेश

Narendra Modi France Visit : AI मुळे नोकऱ्या जाणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "सगळ्यात मोठी भीती.."

PM Modi Paris Visit : फ्रान्समध्ये AI ॲक्शन समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक समिटमध्ये नरेंद्र मोदी यांनी AI मुळे नोकऱ्या जाणार का, नोकऱ्या संपुष्टात येणार का? या मुद्द्यावर भाष्य केले.

Yash Shirke

Narendra Modi at Ai Action Summit : नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्समध्ये बहुप्रतिक्षित AI ॲक्शन समिटचे आयोजन करण्यात आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या समिटचे अध्यक्षपद आहे. ही शिखर परिषद प्रामुख्याने AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित आहे.

या शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर मोदी यांनी भाषण केले. ते म्हणाले, एआय तंत्रज्ञानाचा विकास जलदगतीने होत आहे. हे तंत्रज्ञान लोकाच्या उपयोगासाठी उत्तम असल्याची खात्री करण्यासाठी भारत तांत्रिक अनुभव आणि कौशल्य पणाला लावणार आहे. एआय तंत्रज्ञान स्वीकारण्यात आणि डेटा गोपनीयतेसाठी तांत्रिक-कायदेशीर आधार करण्यात भारत देश पुढे आहे.

आम्ही लोकहितासाठी एआय ॲप्लिकेशन्स विकसित करत आहोत. भारतीयासाठी अत्यंत कमी खर्चात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. एआयशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी आम्हाला जागतिक मानकांची गरज आहे, असे वक्तव्य देखील नरेंद्र मोदीa यांनी केले.

एआयमुळे विविध क्षेत्रातील नोकऱ्या संपुष्टात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावरही मोदी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, एआयची सगळ्यात मोठी भीती म्हणजे त्याच्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जाणार. पण तंत्रज्ञानामुळे कोणाचेही काम जात नाही हे इतिहासाने दाखवून दिले आहे. हा, यामुळे नोकऱ्यांचे, कामाचे स्वरुप मात्र बदलते आणि नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT