Aaditya Thackeray : राज ठाकरेंना पुन्हा टाळी देणार का? आदित्य ठाकरे म्हणतात, भूमिकेतील सातत्य असेल तर...!

Aaditya Thackeray: राज्याच्या राजकारणाबाबत मराठी लोकांच्या मनात असलेला एकमेव प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? दरम्यान याबाबत राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे.
Raj and Uddhav Thackeray
Raj and Uddhav Thackeraysaam tv
Published On

सध्या महाराष्ट्रातील राजकारण हा एक चर्चेचा विषय ठरतोय. राज्याच्या राजकारणाबाबत मराठी लोकांच्या मनात असलेला एकमेव प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? दरम्यान याबाबत राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलं ते पाहूयात.

'कॉफी विथ सकाळ'च्या शोमध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुळात काही विषय समजण्याच्या पलीकडे असतात. काही ठराविक राजकारण रिवाईज करायचं नाही. गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. मात्र आम्ही भूमिका बदललेली नाही. सर्वांसमोर आम्ही मुख्यमत्र्यांना भेटतो आणि ज्या काही मागण्या आहेत, त्या मीडियासमोर मांडतो. पण काही पक्ष बिनशर्त पाठिंबा देतात. कधी स्वबळावर लढतात, मात्र यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे.

Raj and Uddhav Thackeray
Mahayuti Government: महायुतीत पुन्हा धुसफूस? शिंदे गटाच्या मंत्र्यांची कोंडी? उदय सामंतांची उघड नाराजी

तुम्ही कितीही आम्हाला पाडायचा किंवा फोडायचा प्रयत्न तयार करा, पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढणार आहोत. कितीही वार केला तरी आमचा महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही. पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नाही. कधीकधी त्यांच्याकडून पुढाकार घेतला जातो. मात्र त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार नाही. जो देश, संविधान, जपेल आणि भूमिकेत सातत्य दाखवेल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Raj and Uddhav Thackeray
Uday Samant: जरांगेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा संयम बाळगावा; उदय सामंतांचा मित्रत्वाचा सल्ला

महाराष्ट्र-गुजरात असा वाद सुरु!

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मुळात मराठी-गुजराती असा वादच नाही. भाजपमुळे महाराष्ट्र-गुजरात असा वाद सुरू झालाय. मुंबईमध्ये सर्व लोक स्वप्न घेऊन येत असतात. सर्वांची स्वप्न चिरडून तुम्ही काय प्राप्त करतात. राज्यातील उद्योग परराज्यात जातात. नोकऱ्या किती उपलब्ध होतील, हे महत्त्वाचे आहे.

Raj and Uddhav Thackeray
Uday Samant: जरांगेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा संयम बाळगावा; उदय सामंतांचा मित्रत्वाचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com