Myanmar Air strike Saam Tv
देश विदेश

Myanmar Air strike: म्यानमारमध्ये विस्थापितांवर एअर स्ट्राइक, 29 जणांचा मृत्यू

Myanmar News: म्यानमारमध्ये विस्थापितांवर एअर स्ट्राइक, 29 जणांचा मृत्यू

Satish Kengar

Myanmar Air strike News:

म्यानमारमधील विस्थापितांच्या कॅम्पवर हवाई हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील काचिनमध्ये झालेल्या या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यापासून लष्कराचे नियंत्रण आहे. तसेच लष्करी सरकारला विरोध करणाऱ्यांना सरकार लक्ष्य करत असल्याचे आरोप अनेकदा करण्यात आले आहेत.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सोमवारी मध्यरात्री हा हल्ला काचिन इंडिपेंडन्स लष्कराच्या कॅम्पपासून काही अंतरावर झाला. याशी संबंधित काही फोटोही समोर आले आहेत.  (Latest Marathi News)

स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ज्यातील 29 जणांचा रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला.

लष्कराने विमानातून अत्यंत शक्तिशाली बॉम्ब टाकल्याचा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्यात 59 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या भागात हल्ला झाला तो लायझा परिसर केआयएची राजधानी आहे. सैन्यासोबतच्या संघर्षात केआयए हा सर्वात मोठा गट आहे. या भागात लष्कराच्या अत्याचारामुळे आजही हजारो लोकांना विस्थापित कॅम्पमध्ये राहावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

स्वकीयांकडून महाराष्ट्राचा घात; राज ठाकरेंचा अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून CM फडणवीसांना टोला

माजी उपराष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

SCROLL FOR NEXT