Hurun India Rich List: अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश, अदानींना हिंडेनबर्गमुळे मोठे नुकसान

Hurun India Rich List 2023: अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश, अदानींना हिंडेनबर्गमुळे मोठे नुकसान
Mukesh Ambani-Gautam Adani
Mukesh Ambani-Gautam AdaniSaam TV
Published On

Hurun India Rich List 2023:

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. त्यांनी श्रीमंतीत गौतम अदानी यांना मागं टाकलं आहे. नुकतीच हुरुन ग्लोबल रिच लिस्ट प्रसिद्ध झाली आहे.

हुरुन इंडिया आणि 360 वन वेल्थ यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 अहवालात भारतातील अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुकेश अंबानी कुटुंब 8,08,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह अव्वल स्थानावर आहे.

Mukesh Ambani-Gautam Adani
PPF Scheme: सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल श्रीमंत, 10 हजार रुपये गुंतवून 32 लाख कमावण्याची संधी

हिंडेनबर्गमुळे अदानींना फटका

अहवालानुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के वाढ झाली आहे. तर हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी कुटुंबाची संपत्ती 57 टक्क्यांनी कमी होऊन 474,800 कोटी रुपयांवर आल्याचा अंदाज आहे.  (Latest Marathi News)

हिंडेनबर्गने या वर्षी जानेवारीमध्ये अदानी समूहाबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात या समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर समूहाच्या मार्केट कॅपमध्ये ऐतिहासिक घसरण झाली. त्याचबरोबर गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीचेही नुकसान झाले.

Mukesh Ambani-Gautam Adani
Amazon सेल सुरू, 86 हजारांचा 58 इंच 4K स्मार्ट टीव्ही फक्त 23 हजारात खरेदी करण्याची संधी

हिंदुजा पाचव्या क्रमांकावर

गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंबाची संपत्ती अंदाजे 7 टक्क्यांनी वाढली आहे. हिंदुजा 1,76,500 कोटी संपत्तीसह 5 व्या स्थानावर आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी 1,64,300 रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्के जास्त आहे. हिंदुजा दोन स्थानांनी तर सांघवी तीन स्थानांनी या यादीत वर आले आहेत.

लक्ष्मी मित्तलच्या संपत्तीत 7 टक्के वाढ झाली आहे आणि ते अंदाजे 1,62,300 कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत सातव्या क्रमांकावर आहे. तसेच राधाकिशन दमानी हे 1,43,900 कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. कुमार मंगलम बिर्ला कुटुंब 1,25,600 कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com