Crime Saam Tv
देश विदेश

Shocking Crime: चारित्र्यावर संशय अन् गुप्तांगात मिरचीची पूड, इस्त्रीचे चटकेही.. नवऱ्याकडून बायकोचा अमानुष छळ

Woman brutally assaulted by husband: मुझफ्फरपूरमध्ये पतीने संशयावरून पत्नीच्या गुप्तांगात मिरची पूड टाकली आणि इस्त्रीने चटके दिले. पीडिता गंभीर जखमी असून, आरोपी पती अटकेत आहे; तपास सुरू.

Bhagyashree Kamble

बिहारमधील मुझफ्फरपूर परिसरातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवैध संबंधाच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीवर अमानुष अत्याचार केला आहे. आरोपी पतीने पत्नीला आधी मारहाण केली, तिच्या गुप्तांगात मिरची पूड टाकली आणि नंतर गरम इस्त्रीचे चटके देत तीला गंभीर जखमी केलं. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली.

पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पती नेहमी तिला मारझोड करीत होता. हातपाय बांधून उपाशी ठेवत होता. तसेच नराधमाने तिला पाणीही दिलं नाही. एका वृत्त संस्थेशी बोलताना पीडिता म्हणाली, 'लग्नाला १० वर्ष झाली. मला तीन मुलं आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून पती आणि सासरचे मंडळी माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहेत. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी मेडिकल टेस्टसाठी तयार झाले. मात्र, त्यानंतरही मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली', असं पीडितेनं सांगितलं.

पती पीडितेवर वारंवार अत्याचार करीत होता. घरात ओरडण्याचा आवाज ऐकूनही कधीही कुणी मदतीला धावून आले नसल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलंय. पीडितेच्या गुप्तांगात मिरची पूड आणि इस्त्रीचे चटके दिले असल्याचं तिनं आपल्या तक्रारीत म्हटलं. त्या घटनेची दिवशी पीडितेचा भाऊ तिच्या घरी गेला. तेव्हा त्याला सगळी हकिकत कळली. त्याने पीडितेला तातडीने रूग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

१६ जून रोजी पीडितेने सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, पती शत्रुघ्न राय, सासू दुखनी देवी, दीर सुमेश राय आणि दीराची बायको पुष्पा देवी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली असून, इतर तीन आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT