Mumbai-Delhi Flights Affected Google
देश विदेश

Mumbai-Delhi Flight: धुक्यानं रोखली दिल्ली- मुंबई विमानांची उड्डाणं; देशांतर्गत ५५० फ्लाईट्सवर परिणाम

Fog In Delhi : दाट धुक्यामुळे IGI विमानतळ दिल्लीवरून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. आगमन आणि निर्गमनांसह म्हणजेच येणारे आणि जाणाऱ्या विमानांची वाहतूक बंद झालीय. सुमारे ५५० उड्डाणां परिणाम झाला असून त्यांचे टेक-ऑफ उशिराने झाली आहेत. सुमारे ६० उड्डाणे रद्द करण्यात आली तर ११ उड्डाणे वळवावी लागली.

Bharat Jadhav

Mumbai-Delhi Flights Affected :

रविवारी पडलेल्या धुक्यामुळे दिल्लीतील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. IGI विमानतळावरून होणारे विमानांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या विमानतळावीरल सुमारे ६० उड्डाणे रद्द करण्यात आली तर ११ उड्डाणे वळवण्यात आली आहेत. दरम्यान विमानांचे येणारे आणि जाणाऱ्या विमानांना उशीर होत असल्याने विमानतळाचे तिन्ही टर्मिनल प्रवाशांनी खचाखच भरले होते. विमानांना उशीर होत असल्याने वाट पाहून कंटाळलेल्या काही प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला होता. परंतु एअरलाइन्सने हवामानाचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकली. यावेळी प्रवाशांनी इंटरनेट मीडियावर आपल्या व्यथा आणि संताप व्यक्त केला. (Latest News)

देशांतर्गत उड्डाणांवर सर्वाधिक परिणाम

देशांतर्गत उड्डाणांवर सर्वाधिक परिणाम झाले आहे. एकूण ४०० उड्डाणे उशिराने झालीत. यापैकी निम्मे निर्गमन (जाणारी) होते आणि निम्मे (येणारी) आगमन होते. प्रस्थान करताना, कोचीन फ्लाइटला ११ तास, बेंगळुरू फ्लाइटला ९, गोवा फ्लाइट ८, मुंबई फ्लाइट ७, कोलकाता फ्लाइट ६, पोर्ट ब्लेअर फ्लाइट ५, कुल्लू फ्लाइट ४ तास उशीर झाला. मुंबई आणि अहमदाबादहून दिल्लीत येणाऱ्या विमानांना ७ तास , अमृतसरहून येणाऱ्या विमानांना ५, बेंगळुरूहून ४ आणि पुण्याहून आलेल्या विमानांना ३ तास उशीर झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वातावरणात पसरलेल्या दाट धुक्यामुळे वेळापत्रकात सुधारणा न झाल्याने अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ज्या ठिकाणी उड्डाणे रद्द करण्यात आली त्यात कुल्लू, श्रीनगर, दरभंगा, देवघर, हैदराबाद, अहमदाबाद, रायपूर, मुंबई, गोरखपूर, बंगळुरू, कानपूर, पुणे, उदयपूर, प्रयागराज, वाराणसी, पाटणा, गोरखपूर, अमृतसर, गया, रांची, अहमदाबाद यांचा समावेश आहे. चेन्नई, विशाखापट्टणम, मुंबई, भोपाळ, बागडोगरा, कोलकाता, जम्मू, भुवनेश्वर, गोवा आणि इतर ठिकाणी. एकूण सुमारे ६० उड्डाणे रद्द करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT