MP Crime News Saam Digital
देश विदेश

MP Crime News: भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची पत्नीसह धारधार शस्त्राने हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Killed In Ujjain: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरात घुसून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी शनिवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती आहे.

Sandeep Gawade

MP Crime News

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरात घुसून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी शनिवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती आहे. देवास रोडवरील पिपलोडा गावात राहणारे माजी सरपंच आणि भाजप नेते रामनिवास कुमावत आणि त्यांची पत्नी मुन्नीबाई यांची हत्या करण्यात आली आहे. उज्जैनच्या पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. प्राथमिक तपासानंतर दोन्ही हत्या दरोड्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते रामनिवास कुमावत आणि त्यांची पत्नी मुन्नीबाई यांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरातील एका खोलीत सापडले आहेत. त्यांच्या मृतदेहांवर धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. घरातील साहित्यही विखुरलेले आढळले. तसेच घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तुटलेले आढळून आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामनिवा आपल्या पत्नीसोबत गावातील त्याच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. त्यांचा मुलगा देवास शहरात राहतो तर मुलीचं लग्न झालं आहे. दरम्यान ते रोज मॉर्निंग वॉकसाठी जात असत, मात्र आज ते न दिसल्याने गावात राहणाऱ्या त्यांच्या मेव्हण्याने घर गाठले आणि आत जाऊन पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांची बहीण आणि रामनिवास कुमावत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले असता तपासात दरोडा, लुटारू आणि खुनाचा संशय बळावला. ही घटना पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

Mahanagarpalika Election: मुंबईत फक्त महायुती, इतर ठिकाणी स्वतंत्र; स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा असा प्लॅन का? काय आहे रणनीती?

Khakhra Recipe : नाश्त्याला चटपटीत खावंसं वाटतं? १० मिनिटांत बनवा कुरकुरीत मसाला मेथी खाखरा

WhatsApp आणि Instagram वरील चॅटिग होईल सुरक्षित; स्कॅम कॉल्सचा येणार अलर्ट

SCROLL FOR NEXT