दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आम आदमी पार्टीचे 7 आमदार विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे. 'आप'च्या आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटींची ऑफर देण्यात आली आहे. केजरीवाल यांना लवकरच अटक केली जाईल, असे आपच्या आमदारांना सांगण्यात येत आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार, मागील काही दिवसांत भाजपने दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या 7 आमदारांशी संपर्क साधला आहे. अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांनी अटक केली जाईल. त्यानंतर तुमचे आमदार फोडू. आम आदमी पक्षाच्या 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. इतरांशीही बोलणे सुरु आहे. (Latest Marathi News)
त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही पण आमच्यासोबत येऊ शकता. २५ कोटी देणार आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढा. 21 आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र फक्त 7 आमदारांशी संपर्क साधला असून त्या सर्वांनी नकार दिला आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
याचा अर्थ असा की मला कोणत्याही दारू घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी अटक केली जात नाही, तर दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं जात आहेत. गेल्या नऊ वर्षांत भाजपने आपचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. आजपर्यंत त्याला यश मिळालेले नाही. लोकांनी आम्हाला नेहमीच साथ दिली. आमचे सर्व आमदार ठामपणे एकत्र आहेत. यावेळीही भाजपचा हेतू साध्य होणार नाही, असं केजरीवाल यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.