Shreya Maskar
सकाळी नाश्ता बनवायला वेळ मिळत नसेल, तर झटपट १५ दिवस टिकतील असा मसाला मेथी खाखरा बनवा. अगदी १५ मिनिटांत रेसिपी तयार होते.
मसाला मेथी खाखरा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, बेसन, मेथीची पाने, हळद, लाल तिखट, धणे, जिरे पूड, ओवा, तीळ, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
मसाला मेथी खाखरा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, मेथी, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, ओवा, तीळ आणि मीठ घालून मिक्स करा.
त्यानंतर यात तेल घालून कणिक चांगली मळून घ्या. मळलेले पीठ झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा. त्यामुळे खाखरे अधिक मऊ होतील.
पिठाचे लहान गोळे करून गोल चपाती लाटून घ्या. खाखरे पातळ लाटा जेणेकरून ते कुरकुरीत होतील.
पॅनमध्ये तेल गरम करून खाखरे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. खाकरा जळणार नाही याची काळजी घ्या.
मसाला मेथी खाखरा थंड झाल्यावर एयरटाइट डब्यात ठेवा. १५-१८ दिवस खाखरे चांगले टिकतात.
गरमागरम मसाला चहा आणि मसाला मेथी खाखऱ्याचा आस्वाद घ्या. दिवसभर चव जिभेवर रेंगाळत राहिल.