Shreya Maskar
दिवाळीला फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट टोमॅटो शेव बनवा. चटपटीत रेसिपी आताच नोट करा.
टोमॅटो शेव बनवण्यासाठी टोमॅटो, बेसन, हिरवी मिरची, लसूण, मीठ, लाल तिखट, पाणी, तेल इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
टोमॅटो शेव बनवण्यासाठी सर्वप्रथम ताजे पिकलेले टोमॅटो घेऊन त्यांचे लहान तुकडे करा. टोमॅटोच्या बिया काढायला विसरू नका.
मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे तुकडे, हिरवी मिरची, लसूण यांची बारीक पेस्ट करून घ्या. तयार प्युरी छान गाळून घ्या.
एका बाऊलमध्ये बेसन, लाल तिखट, मीठ, गरम तेल, टोमॅटो प्युरी टाकून पीठ घट्ट मळून घ्या. त्यानंतर तयार कणिक १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.
शेव पात्रात मळलेली कणिक टाका आणि दुसरीकडे तेल गरम करायला ठेवून द्या. जेणेकरून गरमागरम शेव तळून घेता येतील.
गरम तेलात शेव पाडा आणि खरपूस तळून घ्या. महत्त्वाचे म्हणजे शेव तळताना गॅस मंद आचेवर ठेवून द्या.
हवाबंद डब्यात शेव स्टोर करा. जेणकरून ते नरम पडणार नाही. तसेच महिनाभर चांगले टिकतील.