Shreya Maskar
मोहनथाळ बनवण्यासाठी चण्याची डाळ, साखर, मावा, साजूक तूप, वेलची , काजू, बदाम, दूध आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
मोहनथाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम परातीमध्ये चण्याच्या डाळीचे पीठ, दूध घालून मिश्रण एकजीव करा. तयार मिश्रण एक तास बाजूला ठेवून द्या.
मिश्रणातील गुठळ्या फोडून चाळणीने चाळून घ्या. म्हणजे तुम्हाला फरफेक्ट मोहनथाळ बनवता येईल. अगदी स्टाइल स्टाइल.
पॅनमध्ये तूप टाकून चण्याची डाळीचे मिश्रण भाजून घ्या. मोहनथाळ हा एक गुजरात गोड पदार्थ आहे. जो तुम्हाला खूप आवडेल.
दुसऱ्या पॅनमध्ये तूप, मावा, साखर, दूध आणि वेलची घालून पाक करा. पाक जळणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर तो कडू लागेल.
पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेले पीठ टाकून ५-१० मिनिटे मंद आचेवर ढवळत रहा. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
मग परातीला साजूक तूप लावून सर्व मिश्रण ओतून एक समान पसरवा.
शेवटी यावर काजू-बदामचे तुकडे टाका आणि तुमच्या आवडीच्या आकारानुसार वड्या पाडा. जवळपास १-२ तास मोहनथाळ फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.