Shreya Maskar
दिवाळीला गोड मिठाई खाऊन झाल्यावर जेवणासाठी काही चटपटीत बनवा. स्ट्रीट स्टाइल व्हेज बिर्याणी योग्य पर्याय आहे. रेसिपी लिहून घ्या.
व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मोठ्या पातेल्यात तेल टाकून तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलदोडे असे सर्व खडे मसाले छान परतून घ्या.
त्यानंतर यात आलं-मिरची-लसूण पेस्ट, कांदा आणि काजूचे काप घालून चांगले परतून घ्यायचे.
यामध्ये तुमच्या आवडत्या भाज्या मिक्स करा. जसे की मटार, फ्लॉवर, बटाटा, मिरची, गाजर, फरसबी. भाज्या उभ्या कापा.
यात तिखट, मीठ, हळद , दही, पुदिना टाका. वरून मस्त तूप सोडा आणि मसाला चांगला मिक्स करून घ्या.
त्यानंतर यात शिजवलेले भात आणि पाणी मिक्स करा. मसाला नीट भाताला लागू द्या. १५- २० मिनिटे भात शिजल्यावर गॅस बंद करा.
व्हेज बिर्याणी शिजल्यावर त्यात कोथिंबीर आणि तळलेला कांदा टाकून सजवा.
काकडीचा रायता आणि तळलेल्या पापडाासोबत व्हेज बिर्याणीचा आस्वाद घ्या. तुम्ही यात तळलेले ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.