Shreya Maskar
जेवणासाठी खास कुळथाची पिठी बनवा. कोकण स्पेशल कुळथाची पिठी कशी बनवावी? साहित्य आणि कृती आताच लिहून घ्या.
कुळथाची पिठी बनवण्यासाठी कुळथाची पिठी, काळी मिरी पूड, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, धणे पूड, जिरे पूड, पाणी, तेल, कांदा, लसूण, कोकम, कोथिंबीर आणि हिंग इत्यादी साहित्य लागते.
कुळथाची पिठी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये कुळथाची पिठी घेऊन त्यात काळी मिरी पूड, हळद, लाल मिरची पावडर, धणे पूड, जिरे पूड, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी घेऊन पातळ बॅटर तयार करुन घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून लसूण, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी तयार करून घ्यावी. फोडणी छान गोल्डन फ्राय करा.
तयार फोडणीत कुळीथ पिठाचे बॅटर टाकून चांगले मिक्स करा. कुळथाची पिठी सतत ढवळत रहा. जेणेकरून पिठीत गुठळ्या राहणार नाही.
कुळथाची पिठीला कोकणी तडका देण्यासाठी यात कोकम घाला. तुम्ही कोकम पाण्यात थोडा वेळ भिजत देखील ठेवू शकता.
शेवटी गॅस बंद करून कुळथाची पिठीवर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा. कुळथाची पिठी चांगली उकळवा म्हणजे पीठ कच्चे राहणार नाही.
भात आणि गरमागरम कुळथाच्या पिठीचा आस्वाद घ्या. एक घास खाताच तुम्हाला गावाकडेची आठवण येईल.