Shreya Maskar
दिवाळीला घरीच सिंपल पद्धतीने फराळ बनवा. चिरोटे हा गोड पदार्थ गावाकडे दिवाळीला बनवला जातो. याची सिंपल रेसिपी आता लिहून घ्या.
चिरोटे बनवण्यासाठी मैदा, तूप, मीठ, पाणी, कॉर्नफ्लॉवर, पिठीसाखर इत्यादी साहित्य लागते. चिरोटे हा गोड पदार्थ आहे. जो दिवाळीच्या फराळात बनवतात.
चिरोटे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, चवीनुसार मीठ, तूप आणि पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यावी. पाणी जास्त टाकू नये, नाहीतर कणिक नीट मळता येणार नाही.
बाऊलमध्ये तूप , कॉर्नफ्लॉवर मिसळून घट्टसर अशी पेस्ट बनवा. दोघांचे समान प्रमाण घ्या. म्हणजे पीठ पातळ होणार नाही.
१०-१५ मिनिटे बाजूला ठेवलेल्या पिठाचे गोळे करून छोट्या चपात्या लाटून घ्या. ४-५ चपात्या एकावर एक लाटून ठेवून द्या.
तयार सर्व चपात्यांवर कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची तयार पेस्ट पसरवून गोलाकार रोल बनवा. रोल तुटणार नाही याची काळजी घ्या.
रोल बनवून झाल्यावर त्याचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या. आता हे तुकडे अलगदपणे लाटून घ्या. लाटताना जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून चिरोटे खरपूस गोल्डन फ्राय तळून घ्या. चिरोटे खुसखुशीत झाले पाहिजे. त्यानंतर चिरोट्यांवर पिठीसाखर भुरभुरवून घ्यावी.