Shreya Maskar
दिवाळी फराळात आपण आवर्जून गोड पदार्थ बनवतो. यात लाडू, करंजी, शंकरपाळी यांचा समावेश असतो. रव्याचे लाडू अनेकांना खूप आवडतात. बिना पाकातले रवा लाडू कसे बनवावे, जाणून घेऊयात.
रवा लाडू बनवण्यासाठी रवा, पिठी साखर, साखर, साजूक तूप, ड्रायफ्रूट्स, दूध, बेदाणे आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सचा समावेश करू शकता.
रवा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून रवा मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. रवा जळणार नाही याची खबरदारी घ्या.
रवा गोल्डन फ्राय झाल्यावर त्यात दूध घालून मिक्स करा. दुधामुळे साखरेच्या पाकाची गरज भासत नाही. लाडू चांगले होतात.
मिश्रणात पिठी साखर टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. पिठी साखर वापरण्यापूर्वी चाळून घ्या. म्हणजे लाडू नीट वळता येतील.
त्यानंतर यात चमचाभर तूप, वेलची पूड घालून मिक्स करून घ्या. वेलची बारीक करूनच लाडूच्या मिश्रणात टाका.
शेवटी मिश्रणात ड्रायफ्रुट्स आणि बेदाणे घालून मिक्स करा. ड्रायफ्रुट्सची पावडर मिश्रणात टाका. म्हणजे लाडू वळताना फुटणार नाही.
हाताला तूप लावून लाडू गोल वळून घ्या. लाडू तयार झाले की त्यावर तुमचा आवडता ड्रायफ्रुट्स लावून सजवा. लहान मुलं आवडीने खातील.