Lasun Sev Recipe : घरीच बनवा झणझणीत-कुरकुरीत लसूण शेव, दिवाळीच्या फराळाची वाढेल रंगत

Shreya Maskar

लसूण शेव

दिवाळीच्या फराळात शेव अनेकांचा आवडता पदार्थ आहे. लसूण शेव बनवण्यासाठी डाळीचे पीठ, लसूण, जिरे, ओवा, हळद, बेसन, लाल तिखट, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Lasun Sev | yandex

लसूण

लसूण शेव बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात लसूण, ओवा, काळी मिरी, हळद, लाल तिखट आणि पाणी घालून पेस्ट बनवू घ्या. पेस्ट जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.

Garlic | yandex

चिमूटभर हिंग

तयार पेस्ट बाऊलमध्ये काढून त्यात तेल, चिमूटभर हिंग आणि मीठ घालून मिक्स करा. तुम्हाला शेव अधिक तिखट हवा असेल तर यात मसाला जास्त टाका.

Lasun Sev | yandex

बेसन

मिश्रण व्यवस्थित फेटून झाल्यावर यात बेसन घालून पुन्हा एकजीव करा. बेसनाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.

Gram flour | yandex

कणिक मळा

आता हळूहळू पाणी घालून कणिक मऊ होईपर्यंत मळून घ्या. कणिक मळल्यानंतर ते १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.

dough | yandex

पीठ

तयार पीठ शेव बनवण्याच्या पात्रात भरा. दुसरीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवा. तुम्हाला ज्या आकाराचा शेव हवा आहे. तसा साचा शेव पात्रात टाका.

Lasun Sev | yandex

शेव पाडा

तेल गरम झाल्यावर त्यात शेव पाडून तळून घ्या. शे‌‌व गोल्डन फ्राय तळा. शेव जळणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर त्याची चव बदलेल.

Lasun Sev | yandex

टिशू पेपर

लसूण शेव मधील तेल शोषून घेण्यासाठी तयार शेव टिशू पेपरवर काढा. म्हणजे पदार्थात जास्त तेल राहणार नाही. अशाप्रकारे चटपटीत लसूण शेव तयार झाला.

Lasun Sev | yandex

NEXT : सणासुदीला अचानक घरी पाहुणे आले? झटपट बनवा पंजाबी स्टाइल छोले, वाचा रेसिपी

Chole Recipe | yandex
येथे क्लिक करा...