Shreya Maskar
दिवाळीला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी खास छोले भटूरे यांचा बेत करा. ही रेसिपी बनवायला सिंपल आहे. तशीच पाहुण्यांना देखील खूप आवडेल.
पंजाबी स्टाइल छोले बनवण्यासाठी छोले रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे छोले चांगले फुलतील.
कुकरमध्ये तेल टाकून तमालपत्र, वेलची, लवंग, काळी मिरी टाका. सर्व खडे मसाले छान फ्राय करून घ्या. त्यानंतर मिश्रणात कांदा गोल्डन फ्राय तळून घ्या.
कांदा गोल्डन फ्राय झाला की, यात बारीक चिरलेली लसूण, आले, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परतून घ्या. भाजी पंजाबी स्टाइल झणझणीत होईल.
फोडणीला तेल सुटायला लागले की, त्यात टोमॅटो आणि हळद घाला. टोमॅटोमुळे भाजीला चांगली चव येईल. तसेच रंग देखील येईल.
पुढे या मिश्रणात मीठ , हिंग आणि छोले मसाला घालून परतून घ्या. शेवटी यात रात्री भिजवलेले छोले टाका. एक छोटा कप पाणी टाका.
कुकरला तीन शिट्या काढून भाजी चांगली शिजवून घ्या. कुकर थंड झाल्यावर भाजी बाऊलमध्ये काढा. छोले नीट शिजले आहे का चेक करा.
शेवटी भाजीवर लिंबू पिळा आणि कोथिंबीर भुरभुरवा. दुसरीकडे गरमागरम भटूरे बनवा आणि रेसिपीचा आस्वाद घ्या.