Shreya Maskar
घरी बनवलेला फराळ दिवाळीची रंगत वाढवतो. त्यामुळे यंदा दिवाळीला घरीच गोड पदार्थांमध्ये अनारसे बनवा.
अनारसे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, गूळ, दूध, तूप, डायफ्रूट्स, खसखस इत्यादी साहित्य लागते.
अनारसे बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात तांदूळ, डायफ्रूट्स आणि गूळ घालून वाटण करा.
वाटलेल्या मिश्रणात गरजेनुसार दूध आणि डायफ्रूट्सची पावडर घालून पीठ मळून घ्या.
मळलेल्या पीठाचे छोटे गोळे करून एका ताटाला तूप लावून अनारसे थापून घ्या.
अनारसे थापून झाल्यानंतर खसखसमध्ये संपूर्ण घोळवून घ्या. म्हणजे त्यांचा खुसखुशीतपणा वाढेल.
पॅनमध्ये तूप गरम करून मध्यम आचेवर अनारसे खरपूस तळून घ्या.
खास दिवाळीला सणासुदीला फराळामध्ये अनारसे बनवा. अवघ्या १५-२० मिनिटांत रेसिपी तयार होईल.