Shreya Maskar
खुसखुशीत नानकटाई बनवण्यासाठी मैदा, गव्हाचे पीठ, तूप, पिठीसाखर, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
नानकटाई बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये मैदा थोडे गव्हाचे पीठ आणि तूप घालून एकजीव करा.
यात पिठीसाखर घालून कणिक मळून १० ते १५ मिनिटांसाठी पीठ ठेवू द्या.
कणिक मऊ होण्यासाठी यात दूध घाला. त्यानंतर वेलची पूड घालून सर्व मिक्स करा.
आता पीठाचे छोटे तुकडे करून त्याला नानकटाईचा आकार द्या.
नानकटाईवर तुम्ही तुमच्या आवडीची डिझाइन देखील काढू शकता.
नानकटाई गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ओव्हनमध्ये १५-२० मिनिटे बेक करा.
नानकटाई थंड झाल्यावर ती नरम होऊ नये म्हणून हवाबंद डब्यात ठेवा.