Shreya Maskar
तिखट शेव बनवण्यासाठी चणा डाळीचे पीठ, तिखट, मीठ, ओवा, हिंग पूड, तेल इत्यादी साहित्य लागते.
तिखट शेव बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळीच्या पिठात ओवा, हिंग, तिखट, मीठ आणि तेलाचे मोहन घालून कणिक मळा.
दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. जेणेकरून शेव चांगलचे तळले जातील.
तयार कणिक शेव पात्रात टाकून प्लास्टिक पेपरवर शेव पाडून घ्या. तुम्हाला हवा त्या आकाराचे शेव तुम्ही पाडू शकता.
प्लास्टिक पेपरवर शेव चिकटू नये म्हणून तेल लावा.
आता गरम तेलात शेव खरपूस तळून गोल्डन फ्राय झाले की काढा.
शेव कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही त्यात रवा देखील टाकू शकता.
कुरकुरीत शेव हवा लागून थंड पडू नये म्हणून हवा बंद डब्यात स्टोर करून ठेवा.