Shreya Maskar
पोह्यांची चकली बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, पोहे, भाजलेली चण्याची डाळ, पांढरे तीळ, मीठ, हळद, मसाला, ओवा, तेल आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
पोह्यांची चकली बनवण्यासाठी पोहे मिक्सरला बारीक करून पीठ चाळून घ्या.
त्यानंतर भाजलेली चण्याची डाळ मिक्सरला बारीक करून घ्या.
एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ, चण्याचे पीठ आणि पोह्यांचे पीठ टाकून मिक्स करा.
दुसरीकडे एक वाटी पाणी उकळवून त्यात मीठ, हळद, मसाला, ओवा, पांढरे तीळ आणि तेल घालून मिक्स करा.
पाण्यात मिक्स केलेले सर्व पीठ टाकून कणिक मळून घ्या.
त्यानंतर सर्व मिश्रण चकली पात्रात टाकून प्लास्टिक शीटला तेल लावून चकली पाडून घ्या.
पॅनमध्ये तेल टाकून चकली मंद आचेवर तळून घ्या.