Mahanagarpalika Election: मुंबईत फक्त महायुती, इतर ठिकाणी स्वतंत्र; स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा असा प्लॅन का? काय आहे रणनीती?

Mahayuti Finalizes Formula for Civic Elections: महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी, महायुतीचा फॉर्मुला ठरलाय. महायुतीने फक्त मुंबईत एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. तर इतर नागरी संस्थांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
Mahayuti Finalizes Formula for Civic Elections:
Mahayuti leaders finalize the election formula — united for Mumbai, separate campaigns for other municipal and local body polls across Maharashtra.saamtv
Published On
Summary
  • महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत फॉर्म्युला ठरला.

  • मतांचे विभाजन टाळण्यासाठी मुंबईत महायुतीची युती कायम असेल.

  • निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय. महायुतीची फक्त मुंबई आणि काही मोजक्या ठिकाणीच एकत्र राहणार आहे. मात्र इतर महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. जरी महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं दिसत असले तरी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार आहेत.

महायुतीचा फॉर्म्युला असा का ठरला?

लोकसभा आणि विधानसभेत युती दाखवणारी महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळं लढणार आहे. मुंबईत आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी एकत्र लढणार आहे. दरम्यान हा निर्णय घेण्यामागे महायुतीची राजकीय रणनीती आहे. महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्याने मविआला आणि अन्य विरोधकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या तीन पक्षांमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मविआच्या उमेदवारांना होईल असा अंदाज आहे. ही गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्ररित्या आणि तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळे लढण्याचा निर्णय महायुतीनं घेतलाय.

Mahayuti Finalizes Formula for Civic Elections:
Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

मुंबई महानगरपालिका सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत. या दोघांचे आव्हान महायुतीसाठी पेलवणे कठीण गेले असते. त्यामुळेच महायुतीने हा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे लढायेच हे आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. आता मात्र त्याचा निर्णय घेतलाय.

Mahayuti Finalizes Formula for Civic Elections:
Maharashtra Politics: ...चोराच्या उलट्या बोंबा, बाळासाहेब थोरातांकडून मतचोरीचा आरोप, भाजप नेत्याचं एका वाक्यात उत्तर

दुसरीकडे महाविकास आघाडीतही काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिलाय. राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस महापालिका निवडणूक लढणार नाही, असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com