
मेटा कंपनीने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसाठी अँटी-स्कॅम फीचर आणलंय.
स्कॅम कॉल्स आणि फसवणूक संदेश आल्यानंतर युझर्सला अलर्ट मिळणार
या अपडेटमुळे चॅटिंग आणखी सुरक्षित होणार आहे.
मेटाच्या व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवर चॅटिंग आता आणखी सुरक्षित होणार आहे. लोकांना स्कॅमपासून वाचवण्यासाठी कंपनीने नवीन फीचर्स लाँन्च केली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. अलिकडच्या काळात ऑनलाइन स्कॅम झपाट्याने वाढले आहेत. तर सायबर गुन्हेगार ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत आहेत.
पण आता, जर एखाद्या युझर्सने व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांची स्क्रीन एखाद्या अज्ञात कॉलरसोबत शेअर केली तर त्यांना एक अलर्ट दिसेल. स्कॅमर अनेकदा डिजिटल अटक सारख्या प्रकरणांमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना लक्ष्य करतात. त्यामुळे हे एक फीचर्स महत्त्वाचे ठरू शकते. मेसेंजरसाठी कंपनी चॅटिगकरिता एआय-संचालित स्कॅम डिटेक्शन टूल विकसित करत आहे. युझर्स एआय पुनरावलोकनासाठी नवीन संपर्कांसह चॅट पाठवू शकणार आहेत.
मेटाने फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपसह त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पासकी Passkey सपोर्ट सुरू केलंय. युझर्स फेस व्हेरिफिकेशन किंवा फिंगरप्रिंट सारख्या डिव्हाइस-स्तरीय प्रमाणिकरणाचा वापर करून साइन इन करू शकतात. मेटा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुरक्षा तपासणी आणि व्हॉट्सअॅपवर गोपनीयता तपासणी वापरण्यास मदत करते.
मेटाने सांगितले की ते दूरसंचार विभागाच्या सहकार्याने 'स्कॅमपासून वाचा ' मोहीम चालवली जाणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना व्हिडिओ कंटेंटद्वारे होणारे स्कॅम कसे ओळखावेत आणि कसे टाळावेत याबद्दल माहिती दिली जाईल. कंपनी सक्षम ज्येष्ठ मोहिमेला देखील पाठिंबा देईल, जी ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता आणि सुरक्षा सत्रे आयोजित करणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.