OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

OPPOने त्यांच्या नवीन फ्लॅगशिप सीरिज Find X9 आणि Find X9 Pro सीरिज जागतिक पातळीवर लॉन्च केले जाणार आहे. हे फोन शानदार कॅमेरा सेटअप, उत्तम प्रोसेसर आणि एआय फीचर्ससह प्रीमियम युझर्स अनुभव देण्यासाठी सज्ज आहेत.
OPPO Find X9 Series
OPPO Find X9 Series with advanced AI-powered camera setup and premium design unveiled globally.saam tv
Published On
Summary
  • OPPO Find X9 आणि Find X9 Pro सीरीजचा ग्लोबल लॉन्च लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • दोन्ही फोनमध्ये अपग्रेड AI कॅमेरा आणि शक्तिशाली Snapdragon प्रोसेसर असणार आहे.

  • भारतात या सीरीजची किंमत ₹70,000 ते ₹85,000 दरम्यान असण्याची शक्यता

Oppoने कंपनीने नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजमधील Find X9 जगभरात लॉन्च केला जाणार आहे. चीनमध्ये लाँन्च झाल्यानंतर कंपनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी बार्सिलोनासह जगभरात हा फोन लॉन्च करणार आहे. या कार्यक्रमात Oppo Find X9 आणि Find X9 Pro अधिकृतपणे लाँन्च केले जाणार आहेत. या सीरिजचे फोन मालिका मोबाइल फोटोग्राफी आणि हे स्मार्टफोन युझर्सला प्रीमियम अनुभव देतील.

Find X9 Pro मध्ये 6.78 इंचाचा 1.5 K LTPO डिस्प्ले आहे, तर Find X9 मध्ये त्याहून थोडा लहान 6.59 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. दोन्हीचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ, जागतिक पीक ब्राइटनेस 1800 निट्स आणि स्थानिक पीक ब्राइटनेस 3600 निट्स आहे. HDR Vivid, Dolby Vision आणि HDR10+ सपोर्टसह डिस्प्ले असणार आहे. ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर देखील उपलब्ध असणार आहे.

दोन्ही फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसेट आहे. 16 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह जोडलेले आहेत. हे फोन अँड्रॉइड 16 वर आधारित कलरओएस 16 वर चालतात. यामध्ये अनेक नवीन एआय-आधारित उत्पादकता साधने आणि स्मार्ट फिचर्स जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे दैनंदिन वापर आणखी सोपा आणि जलद होतो.

OPPO Find X9 Series
Whatsapp Chat: व्हॉट्सअ‍ॅपवर चुकूनही हे मेसेज किंवा व्हिडिओ पाठवू नका, होऊ शकतो तुरुंगवास

अपग्रेड कॅमेरा

Oppo Find X9 मध्ये 50MPचा Sony LYT-828 चा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony LYT-600 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा दिला गेलाय. फ्रंटमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा असेन. तर Find X9 Pro मध्ये प्रायमरी आणि अल्ट्रावाइड कॅमेरा असेन. यात 200MP का पेरिस्कोप टेलीफोटो सेंसर देण्यात आलंय. ज्यात 3x डिजिटल झुमची सुविधा दिली जाते.

OPPO Find X9 Series
WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर! आता स्क्रिन शेअर करता येणार; कसं वापरायचं?

फ्रंट कॅमेरा देखील 50 मेगापिक्सेल पर्यंत अपग्रेड करण्यात आला आहे. ज्यांना मोबाईलवर फोटोग्राफी करणं आवडतं त्यांच्यासाठी हा कॅमेरा सेटअप डिझाइन केला गेला आहे. या कॅमेऱ्यातून शानदार फोटो येतील.

Oppo Find X9 Pro मध्ये 7,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Find X9 मध्ये 7,025mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही बॅटरी 80 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. ज्यामुळे फोन काही मिनिटांतच चार्ज होतो. या बॅटरी दीर्घकाळ टिकणाऱ्या पॉवर देतील आणि लवकर चार्ज होतील, असा कंपनीचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com