Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Flipkart Diwali Offer: दिवाळी सेलमध्ये सॅमसंग गॅलॅक्सी एस 24 FE 5G फक्त 30,999 रुपयांमध्ये ६.७ इंच AMOLED डिस्प्ले, ५०MP कॅमेरा, ८GB RAM, १२८GB स्टोरेज व फास्ट चार्जिंगसह मिळेल.
Flipkart Diwali Offer
Samsung Diwali Salegoogle
Published On

दिवाळीच्या सेलच्या मुहूर्तावर स्मार्टफोन खरेदी करायची योजना आखत असाल आणि तुमचा बजेट ३० हजार रुपयांपर्यंत असेल, तर फ्लिपकार्टवर सॅमसंग Galaxy S24 FE हा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. हा फोन ६.७ इंचाच्या डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्लेचा असणार आहे. तीन दमदार रियर कॅमेरेही मिळतात. या फोनसाठी २९,००० रुपयांचा थेट डिस्काउंट मिळत आहे.

Galaxy S24 FE 5G चा ८ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज असलेला वेरिएंट फ्लिपकार्टवर ५९,९९९ रुपयांच्या खऱ्या किंमतीऐवजी फक्त ३०,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. शिवाय SBI क्रेडिट कार्ड युजर्ससाठी ४,००० रुपयांपर्यंतची सवलतही उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला इथे नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील उपलब्ध असल्यामुळे फोन खूपच किफायतशीर पद्धतीने घर घेता येतो.

Flipkart Diwali Offer
Diwali Meditation: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिवाळीतल्या दिव्यांचा करा वापर, वाचा तज्ज्ञ काय म्हणाले

फीचर्सच्या बाबतीत, Galaxy S24 FE मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट आणि १९०० निट्स पीक ब्राइटनेस असलेला AMOLED डिस्प्ले आहे. तो काळोखातही उत्कृष्ट दृश्य ब्राइटनेस दाखवू शकतो. हा फोन Exynos 2400e प्रोसेसरसह Xclipse 940 GPU मध्ये आहे. हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंग हा बेस्ट फोन असणार आहे.

कॅमेर्‍याच्या बाबतीत यामध्ये ५० MP प्रायमरी कॅमेरा, OIS , १२ MP अल्ट्रा वाइड लेंस आणि ८ MP टेलिफोटो लेंससह तीन रियर कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलसाठी १०MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ४,७००mAh बॅटरी असून, २५W वायर्ड फास्ट चार्जिंग आहे. त्यामुळे फोन लवकर चार्ज होतो. ३० हजारांच्या बजेटमध्ये Galaxy S24 FE हा फोन कॅमेरा, प्रदर्शन आणि बॅटरीच्या बाबतीत बेस्ट पर्याय ठरतो. दिवाळीच्या सेलमध्ये निम्म्या किमतीत मिळणारा हा फोन खरेदीसाठी योग्य ठरु शकतो.

Flipkart Diwali Offer
Navi Mumbai Tourism: फिरण्यासाठी हिल स्टेशन शोधताय? नवी मुंबईपासून ५८ किमीवर वसलंय असं एक ठिकाण, पाहून भुरळ पडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com