Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

मोठ्या प्रवासाचे बेत आखाल. व्यवसायामध्ये चांगली घोडदौड होईल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस सुदिन आहे म्हणायला हरकत नाही.

Mesh | saam tv

वृषभ

आजोळी प्रेम वाढेल. नातेवाईकांच्याकडे विशेषतः मामाकडे जाण्याचे योग आहेत. त्यांच्यापासून काही धनलाभाची शक्यता आहे.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

विष्णू उपासना फलदायी ठरेल. विद्यार्थ्यांना नवीन शिकण्यासाठी चांगल्या काही गोष्टी संधी घेऊन आलेला दिवस आहे. सृजनशीलता वाढेल.

Mithun | saam tv

कर्क

घरगुती आनंद द्विगुणीत होईल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. यंदाची भाऊबीज विशेष स्मरणात राहील.

kark | saam tv

सिंह

बहिण भावाचे अतूट नाते आज आपल्या राशीला विशेषत्वाने शुभ फलित देण्यासाठी आलेले आहे. आपल्या भावंडांच्या पराक्रमावर तुम्ही खुश होऊन जाल.

सिंह | Saam Tv

कन्या

खऱ्या अर्थाने सणांमध्ये आपल्या लोकांचे महत्त्व आपल्याला समजत असते. कुटुंबीयांमध्ये एक प्रकारचे कनेक्शन आज तुमच्या राशीला जाणवेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

आज भाऊबीजेसारखा सण. मनामध्ये भावंडांविषयी प्रेम असणारी आपली रास आहे. याचा आनंद वाढीव करण्यासाठी प्रयत्न कराल आणि सुरुवात स्वतःपासून असेल.

तूळ | saam tv

वृश्चिक

एक सुख येण्यासाठी आपल्याला दोन आपल्या राशीला दोन दुःख घ्यावी लागतात. आज याची पुन्हा एकदा प्रचिती येईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

एखाद्या नवीन गोष्टीचा सामना करण्यासाठी पदर खोचून तयार राहाल. मात्र केलेल्या गोष्टींचे अनेक लाभ तुम्हाला होणार आहेत.

Dhanu Rashi | Yandex

मकर

कष्ट आणि मेहनतीला आपल्या राशीला कधीच पर्याय नसतो. मग त्यासाठी सण असो इतर कुठलेही धार्मिक गोष्टी असो.

मकर | Saam Tv

कुंभ

शिव उपासना आज फलदायी ठरेल. मनाचा कुंभ भरलेला असेल. अर्थात सजग वृत्तीने सर्व गोष्टी कराल. मोठे प्रवास होतील.

कुंभ | Saam Tv

मीन

एखादी गोष्ट ठरवली आहे आणि त्या सहज होईल असे वाटत नाही. "नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न" असा काहीसा आज दिवस आहे.

Meen | Saam Tv

NEXT: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

soft chapati tips | google
येथे क्लिक करा