Mozambique boat accident latest news : आफ्रिकेतील मोझांबिक या देशात एका बोटीचा भयानक अपघात झाला आहे. बोट अचानक उलटल्यामुळे तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता (Beira port boat capsized Indians missing) आहेत. पाच जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत भारताीय उच्चायुक्तालयाकडन माहिती देण्यात आली आहे. (Indian High Commission Mozambique statement)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य मोझांबिकमधील बैरा बंदरात लाँच बोट उलटल्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये तीन जणांच्या मृत्यू झाला आहे. तर पाच भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. शुक्रवारी हा अपघात झाला आहे. या बोटीमध्ये १४ भारतीय नागरिक होते. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांचा अद्याप शोध घेतला जातोय, असे भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले. (Mozambique Boat Tragedy: 3 Indians Dead, 5 Missing After Boat Capsizes Near Beira Port)
रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी समुद्र किनाऱ्यावर नांगरलेल्या टँकरमध्ये कर्मचाऱ्यांची नियमित बदली करण्यात येत होती. या बदलीदरम्यान बोटीची दुर्घटना घडली. बेरा बंदरात बोट उलटली तेव्हा १४ भारतीय नागरिक आतमध्ये होते. बोट कशामुळे उलटली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा शोध घेतला जात आहे.
भारतीय उच्चायुक्तालयाने एक्सवर पोस्ट करत या दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलेय की, आतापर्यंत ५ जणांना वाचवण्यात आले आहे. सर्वजण सुरक्षित आहेत. एका भारतीय नागरिकावर बेइरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेपत्ता झालेल्या पाच भारतीयांचा शोध सुरू ठेवण्यासाठी ते स्थानिक अधिकारी आणि सागरी संस्थांशी समन्वय साधत आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत केली जात आहे.
"बेरा बंदराजवळ झालेल्या बोट अपघातात तीन भारतीय नागरिकांसह झालेल्या जीवितहानीबद्दल आम्ही आमच्या मनापासून शोक व्यक्त करतो . या दुर्दैवी अपघातात ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आम्ही आहोत. त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे," असे एक्सवर पोस्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.