देश विदेश

Moto X30 Pro : 200MP कॅमेरा असलेला फोन लाँच, फक्त ७ मिनिटांत 50 टक्के चार्ज होतेय बॅटरी

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Moto X30 Pro : मोटोरोलानं अखेर बहुप्रतीक्षित स्मार्टफोन आणि जगातील पहिलाच 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto X30 Pro असं या स्मार्टफोनचं नाव आहे. लाँचिंगपूर्वी त्याचा अधिकृत इव्हेंट रद्द झाला होता.

या मोबाइलसंबंधी (Mobile) आतापर्यंत अनेक लीक्स आणि बरेचसे रेंडर्स समोर आले आहेत. हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे आणि तगडी बॅटरी हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे. या फोनच्या बाजूला कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. तर बॅक पॅनलवर तीन इमेज सेन्सर देण्यात आले आहेत.

फ्रंट साइडबाबत बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये ६.७३ इंचाचा पीओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात फुल एचडी प्लस रेझोल्युशनचा डिस्प्ले दिला आहे. त्यात कर्व्ड एज देण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनला प्रीमिअम लूक मिळाला आहे. याशिवाय टाइप सी यूएसबी पोर्ट्स दिला आहे. तर खालील बाजूस स्पीकर्स ग्रिल्स आहेत.

Moto X30 Pro ची वैशिष्ट्ये

Moto X30 Pro मध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. यात स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ चिपसेच आहे. त्यात अॅडव्हान्स ४ एनएमचा प्रोसेस आहे. हा प्रोसेसर ८ जेन १ चिपसेटसह येतो. सोबत यात १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेजही आहे.

या स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ४५०० एमएएचची बॅटरी आहे. जी १२५ वॉटच्या फास्ट चार्जरसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी केवळ सात मिनिटांत ५० टक्के चार्ज होते. यात ५० वॉटचा वायरलेस चार्जर देण्यात आला आहे.

Moto X30 Pro मध्ये कॅमेरा सेटअप दिला आहे. जगातील बहुधा एकमेव असा २०० मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा आहे. Samsung ISOCELL HP1 200 चा सेन्सर आहे. त्यात ६० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT