भयंकर घटना! रक्षाबंधनासाठी निघालेल्या प्रवाशांची बोट बुडाली; ३० हून अधिक प्रवासी बेपत्ता

या बोटीतून जवळपास 30 हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.
Uttar Pradesh Banda Boat Drowned
Uttar Pradesh Banda Boat DrownedANI
Published On

बांदा : एकीकडे देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) एक भीषण दुर्घटना घडली आहे. रक्षबंधनासाठी निघालेल्या प्रवाशांची बोट (Boat Accident) यमुना नदीत उलटली. या बोटीतून जवळपास ३० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. प्राप्त माहितीनुसार बांदा येथे ही दुर्घटना घडली. (Uttar Pradesh Banda Boat Drowned Latest News)

Uttar Pradesh Banda Boat Drowned
Nanded News : भयंकर घटना! एका विडीने अख्खं कुटुंब संपवलं; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

दरम्यान, बोट बुडाल्याची माहिती मिळताच प्रशासनासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बोट बुडताच सुमारे आठ जण पोहत बाहेर आले. पोलिसांनी आतापर्यंत २ लहान मुलांसह एका महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. अजूनही जवळास २० प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुमारे ३० ते ३५ जणांना घेऊन ही बोट फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाटाकडे जात होती. नदीत मध्यभागी पोहोचताच जोरदार वाऱ्याने बोट उलटली, असे पोलिस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Uttar Pradesh Banda Boat Drowned
तंगडं तोडून टाकीन समजलं का..., पुण्यात महिला पोलिसाकडून हमालाला मारहाण, पाहा VIDEO

मार्कापासून फतेहपूर, प्रयागराजपर्यंत लोक यमुना नदी पार करतात, त्यांच्या प्रवासाचे एकमेव साधन म्हणजे बोट आहे. बोटीत ३० ते ४० लोक नदीच्या एका काठावरून दुसऱ्या बाजूला नेले जातात. आज रक्षाबंधनाचा सण असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक तसेच महिलांची संख्या सर्वाधिक होती. दरम्यान, बोटीतून प्रवास करीत असताना, अचानक सुसाट्याचा वारा आला. आणि या वाऱ्याने बोट उलटली.

बोटीमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत २ मुलांसह एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही गोताखोर बुडालेल्या प्रवाशांचा शोध घेत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेतली आहे. योगी यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com