Building collapse at morocco Saam tv
देश विदेश

पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या २ इमारती; १९ रहिवाशांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

Building collapse at morocco : पत्त्याच्या बंगल्यासारख्या 2 इमारती कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत १९ रहिवाशांचा मृत्यू झाला. घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

मोरक्कोमध्ये दोन बहुमजली निवासी इमारती कोसळली, १९ जणांचा मृत्यू 

मृतांमध्ये ४ मुलांचा समावेश, अनेक जण जखमी

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरु होतं रात्रभर बचावकार्य  

उत्तर आफ्रिकेमधील मोरक्कोमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. मोरक्कोमध्ये बहुमजली इमारत कोसळून १९ जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. मोरक्कोच्या मस्सिरा-जौआघा जिल्ह्यात दोन निवासी इमारती मंगळवारी रात्री १० वाजता पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्याची घटना घडली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले. या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये ४ मुलांचा समावेश आहे.

इमारत कोसळल्याने या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घ पोलीस आणि बचाव पथकाकडून रात्रभर मदतकार्य सुरू ठेवलं. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत एकूण किती जणांचा मृत्यू झाला, याविषयी अद्याप अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, निवासी इमारतीचा ढाचा कमकुवत झाला होता. परंतु नेमकी इमारत कशामुळे कोसळली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मोरक्कोमध्ये इमारत कोसळण्याची घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी देखील अनेकदा इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. कॅसाब्लांकाच्या मदिना येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत नऊ जणांनी प्राण गमावले होते. तर २०२५,मे महिन्यात झालेल्या दुर्घटनेत इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला होता.

सरकराने धोकादायक इमारती दुरुस्त करण्याचं अनेकदा आश्वासन दिलं आहे. मागील वर्षी मारकेश आणि आजूबाजूच्या भागातील १२००० हून अधिक धोकादायक इमारती शोधून काढल्या होत्या. त्यातील एक इमारत २०२३ साली झालेल्या भूकंपात कोसळली होती.

इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू

तत्पूर्वी, इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये काल एका सात मजली टॉवरला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत २० जणांचा मृत्यू झाला होता. या इमारतीला आगीने चारू बाजूने वेढलं होतं. या आगीचे लोट सर्व बाजूने पसरले होते. या घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये ५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. या मृतांमधील एक महिला गरोदर होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmers Protest: शेतकरी आंदोलनात हिंसाचार उसळला; दगडफेकीनंतर १८ वाहनांना पेटवलं, अख्या शहरात इंटरनेट बंद, हनुमानगडमध्ये का पेटलं?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, २१०० रुपये...

How To Check Original Jaggery: बाजारात मिळणारा ओरिजनल गूळ कसा ओळखायचा?

Maharashtra Live News Update: मेट्रो 2A व 7 सेवा सकाळी 6 ऐवजी 7 वाजता सुरू होणार

गोमांस खाणाऱ्यांसोबत अमित शाहांचं जेवण, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत 'तो' फोटो दाखवला|VIDEO

SCROLL FOR NEXT