IMD RED ALERT: HEAVY RAIN, THUNDERSTORMS AND MONSOON UPDATE ACROSS INDIA Saam Tv
देश विदेश

Monsoon Alert : १०० किमी वेगानं येतंय महाभयंकर संकट, मान्सून घालणार धुमाकूळ ; 'या' राज्यांना अलर्ट

Monsoon Rain Alert India News : हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळाचा इशारा दिला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

Alisha Khedekar

  • नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा

  • हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला

  • पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळाचा अंदाज

  • मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता

IMD RED ALERT: HEAVY RAIN, THUNDERSTORMS AND MONSOON UPDATE ACROSS INDIA देशासह राज्यात सध्या उष्णतेने अक्षरशः कहर केला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान मान्सून अजून भारताच्या विविध भागांमध्ये पूर्णपणे पसरलेला नसला तरी, अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हवामान विभागाने वायव्य भारतात तीव्र चक्रीवादळे, गारपीट आणि मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट देखील जारी केला आहे.

दरम्यान, आता मान्सून भारतात कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुढील ४८ तासांमध्ये देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये अतिवेगवान वादळ येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड या भागांमध्ये ताशी १०० किलोमीटर वेगाने वादळ धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने काही भागांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे, मान्सूनबाबतही IMD ने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सून वेगाने भारताच्या दिशेने सरकत असून पुढील दोन ते तीन दिवसांत तो अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीपच्या काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात अजूनही उष्णतेची लाट कायम असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT