Monsoon Update : मान्सून २ दिवसांत धडकणार! महाराष्ट्राला पुढील ५ दिवस पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Monsoon Weather Update : केरळमध्ये पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
MAHARASHTRA MONSOON UPDATE: HEATWAVE TO EASE AS RAIN LIKELY ACROSS STATE
MAHARASHTRA MONSOON UPDATE: HEATWAVE TO EASE AS RAIN LIKELY ACROSS STATESaam Tv
Published On
Summary
  • केरळमध्ये पुढील काही दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता

  • विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूरमध्ये उष्ण लाट कायम

  • राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाचा अंदाज

  • हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

  • पुढील पाच दिवस महाराष्ट्रात हवामान बदलण्याची शक्यता

Maharashtra Weather Today 29th May Update News राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केरळमध्ये मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत आहेत. आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाट, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तसेच पुढील ५ दिवस राज्यात पावसाची शक्यता असून माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे.

मान्सूनचा (Kerala Monsoon Update) प्रवास कालपर्यंत लक्षद्वीपपर्यंत पोहोचला होता. मात्र आज त्याची पुढील वाटचाल थोडी मंदावली. तरीदेखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून पुढील २ ते ३ दिवसांत तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon) जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पावसाचा जोर थोडा वाढू शकेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मुंबईत मान्सून (Mumbai Monsoon) दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून आहे.

MAHARASHTRA MONSOON UPDATE: HEATWAVE TO EASE AS RAIN LIKELY ACROSS STATE
Accident News : भयंकर! १४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,आज विदर्भातील ( Vidarbha Heatwave) वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाट आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

MAHARASHTRA MONSOON UPDATE: HEATWAVE TO EASE AS RAIN LIKELY ACROSS STATE
Shocking : सावत्र आई अन् मुलाच्या प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट, प्रियकराच्या आत्महत्येनंतर प्रेयसीने घेतला टोकाचा निर्णय

मध्य महाराष्ट्रातील (Madhya Maharashtra District Rain Alert) पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी (Ratnagiri Weather) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com