Mohammed Shami Political Entry? Viral Photos With Bjp Leader Spark Buzz 
देश विदेश

चहलनंतर आणखी एका क्रिकेटरची राजकारणात एण्ट्री होणार? भाजप अध्यक्षांसोबतचा फोटो व्हायरल,चर्चांना उधाण

Mohammed Shami's Political Entry : टीम इंडियाचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सातत्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे शमी राजकारणात प्रवेश करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. शमीचा एक नवीन फोटो समोर आल्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालंय.

Bharat Jadhav

काही दिवसापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युजवेंद्र चहलनं राजकारणातील नव्या इनिंगला सुरुवात केली. चहलनंतर आता आणखी एक क्रिकेटर भाजपच्या वाटेवर असल्याचं चर्चा सुरू झालीय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका २०२७ मध्ये होणार आहेत. सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी केली जातेय. त्याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

मोहम्मद शमीनं नुकतीच आरएलडी (RLD) अध्यक्ष जयंत चौधरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन नवीन यांची त्याने भेट घेतलीय. या घडामोडींमुळे त्याच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या तर्कवितर्कांना अधिकच बळ मिळालंय.

मोहम्मद शमी राजकारणात प्रवेश करेल का?

काही महिन्यांपूर्वी, भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आरएलडी (RLD) अध्यक्ष जयंत चौधरी यांची भेट घेतली होती. ज्यामुळे तो राजकारणात येऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र शमीने राजकारणातील एण्ट्री करणार असल्याच्या चर्चांना खोडून काढल्या होत्या. आता शनिवारी मोहम्मद शमी यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय स्तरावरील नेते नितीन नवीन यांची भेट घेतलीय. या भेटीदरम्यान भाजपच्या 'अल्पसंख्याक मोर्चा'चे अध्यक्ष कुंवर बासित अली हे देखील उपस्थित होते. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

यामुळे मोहम्मद शमीच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या शक्यतेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शमीने या भेटीला पुन्हा एकदा 'खासगी बाब' असल्याचं म्हटलंय. तो पश्चिम बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असला, तरी तो उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे राहतो. त्यामुळे तो २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अमरोहा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. अलीकडेच शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही केलीय.

शमीचे भारतीय संघात पुनरागमन करण्याचे नियोजन

मोहम्मद शमीने या वृत्तांचे वारंवार खंडन केलंय. अद्याप राजकारणात येण्याचा कोणताही विचार केलेला नाही; जर भविष्यात त्याने असा निर्णय घेतला, तर तो नक्कीच सर्वांना कळवेल. मात्र सोशल मीडियावर तो भाजपमध्ये सामील झाल्याच्या चर्चा सुरूच आहेत. दरम्यान इतर काही प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, शमीचा भाऊ हसीब अहमद निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरू शकतो. तर शमी स्वतः मात्र पूर्णपणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याच्या विचारात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Challan : वर्षभरात पाच चालान भरावे लागले तर ड्रायव्हिंग विसरा, परवाना होईल निलंबित, वाहतुकीचा नवा नियम जाणून घ्या

Face Wash Side Effects: ग्लोईंग फेससाठी वारंवार फेसवॉश बदलताय? चेहऱ्याच्या त्वचेवर होऊ शकतात हे गंभीर परिणाम

कशेडी बोगद्यात आगीचा भडका! धावता ट्रक जळून खाक, मुंबई-गोवा महामार्गावर थरार

नवरीला लग्नात घेण्यासाठी 5 भन्नाट उखाणे, जे ऐकून सर्वजण करतील कौतुक

EPFO Rules 2026: निवृत्तीनंतर PF मधून दरमहा मिळणार 7 हजार रुपये? वाचा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT