Face Wash Side Effects: ग्लोईंग फेससाठी वारंवार फेसवॉश बदलताय? चेहऱ्याच्या त्वचेवर होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Face Wash Side Effects: वारंवार फेस वॉश बदलण्याची सवय त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. कोरडेपणा, खाज, लालसरपणा आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी योग्य फेस वॉश कसा निवडावा, जाणून घ्या.
Face Wash Side Effects
Face Wash Side EffectsSaamTv
Published On: 

Face Wash Side Effects: स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरतात. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी फेस वॉशचा वापर केला जातो. बाजारात प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळे फेस वॉश मिळतात. मात्र, काहीजण सतत नवीन फेस वॉश वापरून पाहतात. जाहिराती पाहून किंवा दुसऱ्यांचा सल्ला ऐकून फेस वॉश बदलतात. पण असे वारंवार केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. आपल्या त्वचेवर एक नैसर्गिक थर असतो, जो त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो आणि धूळ, माती व प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करतो. सतत फेस वॉश बदलल्याने त्वचेला काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊयात

तुमच्या स्किनला योग्य नसलेला फेस वॉश वापरल्यास चेहरा कोरडा पडू शकतो. तसेच स्किनवर खाज, जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो. काही फेस वॉशमध्ये जास्त केमिकल्स आणि सुगंध असतात. त्यामुळे संवेदनशील स्किन असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. चेहरा धुतल्यानंतर स्किन ताणल्यासारखी वाटणे किंवा त्वचा सोलवटणे अशी लक्षणेही दिसू शकतात. काही वेळा चुकीच्या फेस वॉशमुळे पिंपल्सची समस्याही वाढू शकते.

Face Wash Side Effects
December Travel: डिसेंबरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? देशातील हे ७ खास फेस्टिव्हल्स बनवतील ट्रिप अविस्मरणीय!

प्रत्येकाची स्किन वेगळी असते. काहींची स्किन तेलकट असते, तर काहींची स्किन कोरडी किंवा संवेदनशील असते. त्यामुळे आपल्या त्वचेला कोणता फेस वॉश योग्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तेलकट त्वचेसाठी वापरला जाणारा फेस वॉश कोरड्या त्वचेला त्रास देऊ शकतो. त्यामुळे सौम्य आणि त्वचेला सूट होणारा फेस वॉश निवडा. यासोबतच चेहऱ्याचा ओलावा टिकवण्यासाठी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा.

Face Wash Side Effects
Silver Jewellery Cleaning: काळे पडलेले चांदीचे दागिने नव्यासारखे चमकतील! फक्त हे ३ घरगुती उपाय करा

एखादा फेस वॉश वापरल्यानंतर चेहऱ्यावर खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवत असेल, तर त्याचा वापर थांबवा. वारंवार त्वचेच्या समस्या होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सतत नवीन फेस वॉश वापरण्यापेक्षा त्वचेला योग्य असलेला एक फेस वॉश नियमित वापरणे चांगले. महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा त्वचेची योग्य काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.