December Travel: डिसेंबरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? देशातील हे ७ खास फेस्टिव्हल्स बनवतील ट्रिप अविस्मरणीय!

December Travel: डिसेंबरमध्ये ट्रिप प्लॅन करताय? तर नागालँडपासून केरळपर्यंत भारतातील हे ७ खास फेस्टिव्हल्स, संगीत, खाद्यसंस्कृती आणि पर्यटनाचा आनंद घेण्याची उत्तम संधी देतात.
December Travel
December TravelSaam Tv
Published On: 

December Travel: वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर. थंडीचे वातावरण, सुट्ट्यांचा आनंद आणि नवीन ठिकाणांना भेट देण्याची संधी यामुळे हा महिना फिरण्यासाठी खास असतो. तुम्हीही तुमच्या मैत्रिणींसोबत, घरच्यासोबत किंवा कपलमध्ये एखादी छान ट्रिप प्लॅन करत असाल, तर यंदाचा डिसेंबर तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक सांस्कृतिक आणि संगीत महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हल्समध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ, संगीत, नृत्य, खरेदी आणि सुंदर ठिकाणांचा आनंद घेता येईल. चला तर जाणून घेऊया असे ७ खास फेस्टिव्हल्स!

१. हॉर्नबिल फेस्टिव्हल, नागालँड

नागालँडमधील किसामा हेरिटेज व्हिलेज येथे १ ते १० डिसेंबरदरम्यान हॉर्नबिल फेस्टिव्हल आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात नागालँडमधील १७ प्रमुख जमातींची संस्कृती, पारंपरिक नृत्य, लोकगीते आणि खाद्यसंस्कृती अनुभवता येईल. संगीताची आवड असणाऱ्यांसाठी येथे रॉक म्युझिकचीही खास मेजवानी असते.

२. गलदान नामचोट, लडाख

३ डिसेंबर २०२६ रोजी लडाखमध्ये गलदान नामचोट हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी मठ, स्तूप आणि घरांमध्ये हजारो बटर लॅम्प म्हणजेच लोण्याचे दिवे प्रज्वलित केले जातात. बर्फाच्छादित लडाखमधील हे सुंदर दृश्य अनुभवण्याची संधी मिळेल.

December Travel
ShahRukh Khan: शाहरुख खान ठरला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता; किंग खानची संपत्ती पाहून व्हाल थक्क!

३. सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल, गोवा

१३ ते २० डिसेंबरदरम्यान पणजीमध्ये सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल होणार आहे. कला, संगीत, डान्स, फोटोग्राफी, नाटक आणि खाद्यसंस्कृतीची आवड असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. आपल्या प्रियजनांसोबत कलाविश्वाचा आनंद घेण्यासाठी हा फेस्टिव्हल खास आहे.

४. तानसेन संगीत समारोह, ग्वाल्हेर

१४ ते १९ डिसेंबरदरम्यान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे १०२वा तानसेन संगीत समारोह आयोजित केला जाणार आहे. शास्त्रीय संगीताचे दिग्गज कलाकार येथे परफॉर्मन्स करणार आहेत. संगीतप्रेमींसाठी हा एक खास अनुभव ठरू शकतो.

December Travel
Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये सलमान खानचा चढला पारा! स्काउट आणि गुल्लूला सुनावले खडेबोल, लव्ह गिलला अश्रू अनावर

५. जयगड हेरिटेज फेस्टिव्हल, जयपूर

१८ ते २० डिसेंबरदरम्यान जयपूरमधील आमेर येथील जयगड किल्ल्यावर हा महोत्सव रंगणार आहे. राजस्थानी लोकसंगीत, हेरिटेज वॉक, हस्तकला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा आनंद येथे घेता येईल.

६. रण उत्सव, कच्छ

गुजरातमधील कच्छ येथील धोरडोमध्ये डिसेंबर महिन्यात रण उत्सवाचा विशेष उत्साह पाहायला मिळतो. पांढऱ्याशुभ्र रणातील चांदण्यांचा अनुभव, कच्छी नृत्य, संगीत, पारंपरिक कपडे आणि स्थानिक दागिन्यांची खरेदी हा या उत्सवाचा विशेष आकर्षण आहे. २२ ते २४ डिसेंबरदरम्यान पौर्णिमेच्या आसपासचा काळ विशेष आकर्षक ठरू शकतो.

७. कोचीन कार्निव्हल, केरळ

२५ डिसेंबर २०२६ ते १ जानेवारी २०२७ या कालावधीत फोर्ट कोची येथे कोचीन कार्निव्हल आयोजित केला जाणार आहे. संगीत, कला, समुद्रकिनाऱ्यावरील खेळ आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पप्पनजीच्या पुतळ्याचे दहन हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे.

गर्ल्स ट्रिप प्लॅन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

डिसेंबरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाताना तेथील हवामानानुसार कपड्यांची निवड करा. लडाखसाठी थर्मल कपडे आणि जॅकेट, तर गोवा आणि केरळसाठी हलके कपडे सोबत ठेवा. हॉर्नबिल फेस्टिव्हल, रण उत्सव आणि कोचीन कार्निव्हलसाठी हॉटेल बुकिंग आधीच करा. तसेच नागालँडला जाताना इनर लाइन परमिटची आवश्यकता लक्षात ठेवा. योग्य नियोजन केल्यास ही ट्रिप नक्कीच अविस्मरणीय ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.