ShahRukh Khan: शाहरुख खान ठरला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता; किंग खानची संपत्ती पाहून व्हाल थक्क!

Shruti Vilas Kadam

शाहरुख खान सर्वात श्रीमंत अभिनेता

हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ नुसार, बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे. त्यांची अंदाजे संपत्ती १०,००० कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Shahrukh Khan | Saam Tv

एका वर्षात २,४९० कोटींची घट

हुरुनच्या २०२५ च्या यादीत शाहरुख खानची संपत्ती १२,४९० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. यंदा हा आकडा १०,००० कोटींवर आला आहे.

Shahrukh Khan | Saam Tv

व्यवसायातूनही मोठी कमाई

शाहरुख खानच्या संपत्तीच्या अंदाजात केवळ चित्रपटातील कमाईचा समावेश नाही. Red Chillies Entertainment आणि Knight Riders Sports यांसारख्या व्यावसायिक गुंतवणुकींचाही यात समावेश आहे.

Shahrukh Khan | Saam Tv

अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

या यादीत अमिताभ बच्चन यांची अंदाजे संपत्ती ४,००० कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Amitabh Bachchan Income

सलमान खानची यादीत एन्ट्री

सलमान खान यांची अंदाजे संपत्ती ३,००० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये सलमान खानची नवीन एन्ट्री झाली आहे.

Salman Khan

ऋतिक रोशनचाही यादीत समावेश

ऋतिक रोशनची संपत्ती २,५०० कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्या HRX या फिटनेस आणि लाइफस्टाइल ब्रँडमुळे त्याच्या संपत्तीत वाढ होत असल्याचे सांगितले आहे.

ऋतिक रोशन

'किंग'मधून पुन्हा रुपेरी पडद्यावर

शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात सुहाना खानसह अन्य कलाकार दिसणार आहेत.

actor threat

Palak Besan Chilla Recipe: रोज सकाळी नाश्त्यासाठी बनवा हेल्दी पालक बेसन चीला, वाचा सोपी रेसिपी

Palak Besan Chilla Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा