कशेडी बोगद्यात आगीचा भडका! धावता ट्रक जळून खाक, मुंबई-गोवा महामार्गावर थरार

Kashedi Tunnel Fire: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात इलेक्ट्रिक साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली. ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून, धुरामुळे दोन्ही लेनमधील वाहतूक बंद करण्यात आली.
MUMBAI-GOA HIGHWAY
MUMBAI-GOA HIGHWAYsaam tv
Published On: 

सचिन कदम, साम टीव्ही

मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात एका धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने इलेक्ट्रिक साहित्य घेऊन जाणाऱ्या या ट्रकने बोगद्यात अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या दुर्घटनेत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

MUMBAI-GOA HIGHWAY
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाड यांचे मोठे विधान

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने इलेक्ट्रिक साहित्य घेऊन जाणारा ट्रक कशेडी बोगद्यातून जात असताना अचानक ट्रकला आग लागली. बोगद्यासारख्या बंदिस्त ठिकाणी ट्रकने पेट घेतल्याने काही वेळातच मोठ्या प्रमाणात धूर पसरला. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे बोगद्यातील परिस्थिती गंभीर बनली. बोगद्यातून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांनाही याचा मोठा फटका बसला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने हालचाली सुरू केल्या.

MUMBAI-GOA HIGHWAY
Matheran news : माथेरानच्या मिनी ट्रेनच्या रुळांवर कार कोसळली! थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, कशेडी बोगदा हा मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा मार्ग असून, या बोगद्याची लांबी तब्बल अडीच किलोमीटर आहे. बोगद्यात ट्रकला आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर साचू लागला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बोगद्याच्या दोन्ही लेनमधील वाहतूक तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, मुंबईहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या तसेच गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली.

MUMBAI-GOA HIGHWAY
Delimitation Bill: यांचा विरोध डिलिमिटेशनला नाही तर महिला आरक्षणाला, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आगीची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ट्रकमधील इलेक्ट्रिक साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.