अग्निवीर योजनेत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आलाय.
७५ टक्के अग्निवीरांना दोन वर्षांची सेवा मुदतवाढ मिळणार
उर्वरित २५ टक्के अग्निवीरांची नियमित सैनिक म्हणून निवड करण्याची विद्यमान तरतूद
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 'अग्निवीरांना' एक मोठं गिफ्ट दिलंय. त्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, अग्निवीरांना आता कायमस्वरुपी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासह काही अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळणार आहे.
योजनेतून लष्कराता दाखल झालेल्या २५ टक्के अग्निवीर नियमित सैनिक बनतील. तर उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना दोन वर्षांची सेवा मुदतवाढ दिली जाणार आहे. म्हणजेच या अग्निवीरांचा सेवा कालावधी चार वर्षांवरून सहा वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी या योजनेतील बदलाची माहिती दिलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सीडीएस जनरल एन. एस. राजा सुब्रमण्यम म्हणाले, 'आजचा दिवस भारतीय सशस्त्र दल आणि आपल्या 'अग्निवीरांसाठी' अत्यंत महत्त्वाचा आहे. मंत्रिमंडळाने सर्व अग्निवीरांना भारतीय सशस्त्र दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे'
'अग्निपथ' योजना १४ जून २०२२ रोजी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी 'अग्निवीरांच्या' कामगिरीचे सातत्याने मूल्यमापन केले जाईल आणि या योजनेचाही वेळोवेळी आढावा घेतला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. आता अग्निवीरांची पहिली तुकडी त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. या चार वर्षांत केलेल्या कामगिरीच्या मूल्यमापनाच्या आधारे, त्यांच्या कामाबद्दल आम्हाला अत्यंत सकारात्मक अभिप्राय मिळाले.
अग्निवीरांपैकी २५ टक्के अग्निवीरांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर नियमित सैन्यात समाविष्ट केले जाणार आहे. याआधी ७५% अग्निवीरांच्या बाबतीत अशी तरतूद होती की, ते शिस्तबद्ध आणि प्रेरित तरुण म्हणून समाजात परततील; मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाने आता यात बदल करण्यास मंजुरी दिल्याचं सीडीएस जनरल एन. एस. राजा सुब्रमण्यम म्हणाले.
ज्या अग्निवीरांना दोन वर्षांची सेवा-कालावधी वाढ मिळेल, त्यांना त्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनाच्या आधारे पुढे कायमस्वरूपी पदे दिली जातील. ज्या अग्निवीरांना सेवा-कालावधीत वाढ मिळेल, त्यांना वाढीव वेतन आणि भत्ते मिळण्याचा अधिकार असेल, अशी माहितीही सीडीएस जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.