MK Stalin addresses party workers, claims Thalapathy Vijay-led Tamil Nadu government may collapse soon. saam tv
देश विदेश

तमिळनाडू सरकार कोसळणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा; राजकारणात खळबळ

TamilNadu Government Collapse Stalin Claim: तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी थलपती विजय यांच्या सरकारवर मोठा दावा केला आहे. पुढील 3 ते 6 महिन्यांत सरकार कोसळून पुन्हा निवडणुका लागू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्याचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, विजय यांचे सरकार लवकरच कोसळू शकते आणि राज्यात निवडणुका होऊ शकतात. मागच्या महिन्यात निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी एका सभेमध्ये वक्तव्य केले. तसेच राज्यात लवकरच निवडणुका होतील असेहि भाकीतही केले. स्टॅलिन म्हणाले, मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या टीव्हीके सरकारकडे बहुमत नाहीये आणि राज्यात पुढच्या तीन ते सहा महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुका होऊ शकतात. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारचे संख्याबळाचे गणितही स्पष्ट केले.

तामिळनाडू विधानसभा 234 सदस्यांची असून बहुमतासाठी किमान 118 जागा आवश्यक आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये TVK हा मोठा पक्षा असला तरी त्यांना फक्त 108 जागा मिळाल्या. त्यानंतर विजय यांनी कॉँग्रेस, IUML आणि VCK या पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. स्टॅलिन यांनी यावर टीका करत म्हटले की, हे सरकार स्वतःच्या बळावर नाही तर इतर पक्षांच्या आधारावर टिकून आहे.

कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश

स्टॅलिन यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर द्रमुक कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. निवडणुका कधीही लागू शकतात. तीन महिन्यांत किंवा सहा महिन्यांतही लागू शकतात. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा असे ते म्हणाले.

या भाषणादरम्यान स्टालिन यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि आर्थिक परिस्थितीवरही सरकारला घेरले. राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांत वाढ झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच अघोषित वीज कपात होत असून चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या उद्योगांनी राज्य सोडण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT