Attacked At The Thieves Market In India Saam Tv
देश विदेश

Bengaluru YouTuber Attack Update: परदेशी युट्युबरवर हल्ला करणाऱ्याला अखेर अटक, नेमकं प्रकरण काय?

Priya More

Bengaluru News: बंगळुरुमध्ये परदेशी युट्युबरसोबत गैरवर्तन करत त्याला मारहाण करणाऱ्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरुतील चोर बाजारामध्ये (Bangalore Sunday Bazaar) रविवारी ही घटना घडली होती. याप्रकरणी युट्युबरला मारहाण झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. आता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुतील चोर बाजार ज्याला संडे मार्केट म्हणून ओळखले जाते तिथे युट्यूबरला मारहाण करण्यात आली होती. पेड्रो मोटा असे या डच युट्युबरचे नाव असून त्याला माराहण करण्यात आली होती. आपल्या युट्युब चॅनेलसाठी ब्लॉग तयार करत असताना त्याच्यासोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केले होते. ऐवढंच नाही तर त्याचा हात पकडून त्याला धक्काबुक्की केली होती. या घटनेचा व्हिडिओ या युट्युबरने त्याच्या मॅडली रोव्हर चॅनलवर शेअर केला आहे.

नवाब ह्यात शरीफ असं युट्युबरला मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. तो युट्युबरशी गैरवर्तन करत त्याला मारहाण करतो. त्यानंतर कसाबसा हा युट्युबर त्याठिकाणावरुन पळून जातो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन नेटिझन्सनी युट्युबरला मारहाण करणाऱ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली होती. युट्युबरला मारहाण करणाऱ्या नवाबविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत आता त्याला अटक केली आहे

घटना अशी आहे की, यूट्यूबर रविवारी बेंगळुरूमधील चोर बाजारामध्ये फिरण्यासाठी जातो. त्यावेळी तो वस्तू खरेदी करत चोर बाजाराचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत युजर्सला माहिती देतो. बाजारात फिरत असताना त्याचा नवाबला धक्का लागतो. युट्युबर त्या नवाबला नमस्कार सर म्हणतो. पण धक्का लागल्यामुळे नवाब संतप्त होतो. तो युट्युबरचा हात धरून "हे काय आहे, हे काय आहे" असे विचारतो. तू नशेत आहेस का? असं देखील तो युट्युबरला विचारतो. तो युट्युबरसोबत गैरवर्तन करत हल्ला करतो. त्यानंतर युट्युबर त्याचा हात झटकून घटनास्थळावरुन पळून जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT