Himachal Pradesh Landslide Saam Tv
देश विदेश

Shocking News: मध्यरात्री भूस्खलनाची चाहूल लागली, कुत्र्याने भुंकून भुंकून गावाला उठवलं, ६७ जणांचा जीव वाचवला

Himachal Pradesh Landslide: हिमाचल प्रेदशच्या मंडीमध्ये भूस्खलन झाले. या मध्ये संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली अडकले. गावातील एका पाळीव कुत्र्यामध्ये ६७ जणांचे प्राण बचावले.

Priya More

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यामध्ये भूस्खलना होऊन संपूर्ण गाव जमिनदोस्त झालं. याठिकाणी एका कुत्र्याच्या सतर्कतेमुळे तब्बल ६७ जणांचे प्राण वाचले. या भयानक रात्रीने अनेकांचे आयुष्य कायमचे बदलले. ३० जूनच्या मध्यरात्री स्यायी गावातील सर्वजण गाढ झोपेत होते तेव्हा अचानक गावातील पाळीव कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. त्याच्या आवाजाने सर्वजण जागे झाले आणि घराबाहेर पडले. तेवढ्यात भूस्खलन झाले. कुत्र्याच्या सतर्कतेमुळे गावातील ६७ जणांचे प्राण वाचले.

स्यायी गावातील रहिवासी असलेला नरेंद्र यांचा पाळीव कुत्रा घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपला होता. पण त्याला काही तरी विपरीत घडणार असल्याचे जाणवले. भूस्खलनाची चाहूल त्याला लागली. त्यानंतर तो जोर जोरात भुंकू लागला. कुत्र्याचा आवाज ऐकून नरेंद्र यांना जाग आली आणि त्यांनी पाहिले की घराच्या भिंतीला एक मोठी भेगा पडली आहे आणि आत पाणी शिरू लागले आहे. त्यांनी प्रसंगवधान राखत घराबाहेर धाव घेतली आणि संपूर्ण गावाला आवाज देऊन सावध केले आणि घराबाहेर पडायला लावले.

एकही क्षण वाया न घालवता नरेंद्र यांनी जवळच्या घरांमधील लोकांना जागे केले आणि त्यांना घर रिकामे करण्यास सांगितले. काही मिनिटांतच मोठे भूस्खलन झाले ज्यामुळे गावातील डझनभराहून अधिक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. नरेंद्र आणि त्याच्या पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेमुळे गावातील ६७ जणांना वेळेवर घरातून सुरक्षित बाहेर पडता आले. आता गावात फक्त ४-५ घरे उभी आहेत उर्वरित घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. स्याथी गावातील नागरिक या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आयुष्यभर विसरणार नाहीत ज्याच्यामुळे ते मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले.

हिमाचल प्रदेशमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. सरकारी अहवालानुसार, आतापर्यंत २२५ घरे, २४३ गोठ्या, १४ पूल आणि डझनभर रस्ते खराब झाले आहेत. २१५ गुरेढोरे या पावासामुळे मृत्युमुखी पडली आणि ७८ लोकांचा यामुळे जीव गेला. यामधील ५० मृत्यू केवळ पाऊस आणि भूस्खलनामुळे झाले आहेत. एकूण नुकसानीचा आकडा ७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अजूनही हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस सुरूच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, पाहा फोटो

दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, ट्रॅकमनने वेळीच बाहेर खेचलं; कर्मचारी रविकुमार यांचं सर्वत्र कौतुक

Chhatrapati Sambhaji nagar : मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिवाचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत २ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये तरुणाने दुकानातील मोबाईल फोडले, EMIवर मोबाईल न दिल्याच्या रागातून कृत्य

Shocking News : दिरासोबतच्या प्रेम प्रकरणात पती अडसर, कुख्ख्यात शुटरकडून नवऱ्यावर गोळी चालवली; पुढे जे घडलं ते भयंकर...

SCROLL FOR NEXT