Sikkim Landslide : महाराष्ट्रावर दुसरं संकट! सिक्कीमध्ये भूस्खलन; मुसळधार पावसामुळे रस्ते बंद, अकोल्यातील १६ जणांचं डॉक्टर कुटुंब अडकलं

Sikkim Landslide : अकोल्यातील १६ पर्यटकांसह महाराष्ट्रातील जवळपास १००हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये भूस्खलन आणि हिमस्खलनामूळे अडकले असल्याची माहिती आता समोर आली आहे.
Sikkim Lachung Landslide
Sikkim Lachung LandslideSaam Tv News
Published On

अक्षय गवळी, साम टिव्ही

अकोला : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झालाय. या घटनेत तब्बत २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर या मृतांमध्ये सात जण महाराष्ट्रातील होते. ही घटना घडल्यानंतर आता पुन्हा एक संकट महाराष्ट्रावर ओढावलं आहे. ते म्हणजे, अकोल्यातील १६ पर्यटकांसह महाराष्ट्रातील जवळपास १००हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये भूस्खलन आणि हिमस्खलनामूळे अडकले असल्याची माहिती आता समोर आली आहे. सिक्कीममधील लाचूंग येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे.

राज्यातील पुणे, मुंबई, अकोला आणि नागपुरातील पर्यटकांचा या दुर्घटनेत समावेश आहे. यात अकोल्यातील चार नामांकित डॉक्टरांच्या कुटूंबातील १६ जण अडकले आहेत. लाचूंग हे ठिकाण सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील नावाजलेले हिल स्टेशन आहे. १६ जणांमध्ये पुरूष, महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. अकोल्यातील डॉ. प्रशांत बारापात्रे, डॉ. शितल टोंगसे, डॉ. संजय शिंदे आणि डॉ. प्रभाकर जायभाये हे चार डॉक्टर कुटुंबियांसह अडकले आहेत.

Sikkim Lachung Landslide
Pahalgam Terror Attack : मॅगीमुळे आमचा जीव वाचला! नाशिककरांनी कथन केला थरारक अनुभव, म्हणाले गोळीबार होत असताना...

अडकलेल्या चारही कुटुंबांनी आमदार अमोल मिटकरींशी संपर्क साधला आहे. अमोल मिटकरींनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क केला आहे. या लोकांच्या रेस्क्यूसाठी राज्य सरकारकडून कसोसीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सिक्कीममधील सरकार आणि प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

Sikkim Lachung Landslide
Nashik Crime : कबड्डीत अव्वल आल्याने डोक्यात तिडीक गेली, ३-४ पोरींनी एकटीला घेरुन बदडलं; नाशकातील 'तो' VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com