Jaipur Agra highway latest accident news Saam TV Marathi News
देश विदेश

Accident : मध्यरात्री हायवेवर मृत्यूचं तांडव, लग्नाहून आलेली कार आधी डिव्हायडरला धडकली मग....; ६ जणांचा मृत्यू

Jaipur Agra highway latest accident news : राजस्थानातील जयपूर-आग्रा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कारने आधी डिव्हायडरला धडक दिल्यानंतर ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने कारचा चुराडा झाला. सिकंदरा पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

Jaipur Agra highway latest accident news : राजस्थानातील जयपूर-आग्रा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. सिकंदरामधील (Sikandra police accident report) कैलाई गावाजवळ कार आधी डिव्हायडरला जोरात धडकली, त्यानंतर दुसऱ्या लेनवर जाणाऱ्या ट्रेलरला जोरात धडक दिली. (Rajasthan road accident today)

कारच्या या भयानक अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा रूग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी (Traffic jam after highway accident) झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Jaipur Agra highway midnight accident six dead details)

अपघाताची माहिती मिळताच सिकंदरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्यांनी अपघातामधील जखमींना तात्काळ रूग्णालयात हलवले, पण दोन जणांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारमधील ६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

येथील सिकंदरा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून ६ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. हा अपघात इतका भयंकर होता की कारची धडक झाल्याचा आवाज गावात गेला होता. गावकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही जणांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

राजस्थानमधील कलाखो गावातील ६ तरूण कारमधून प्रवास करत होते. ते लग्नानंतर घराकडे परत येत होते. पण त्याचवेळी काळाने घाला घातला. त्यांची कार अतिशय वेगात होती. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. अन् कार डिव्हायडरला जोरात धडकली. कारचा वेग इतका होता की डिव्हायडरला धडकल्यानंतर कार महामार्गावरील दुसऱ्या लेनवर गेली अन् ट्रेलरला जोरात धडकली.

या धडकेमुळे कारचा पूर्ण चुराडा झाला. यामध्ये चौघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर उपचारासाठी नेत असताना २ जणांनी प्राण सोडले. गोवर्धन योगी, बनवारी लाल योगी, हरिमोहन योगी, लालराम बैरवा आणि रामसिंह योगी यांचा अपघातात मृत्यू झाला. सर्व मृतदहे वेगवेगळ्या रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Makeup Tips: ऑफिससाठी परफेक्ट आणि सिम्पल मेकअप हवा असेल तर या सोप्या ७ टिप्स नक्की फॉलो करा

मुंबईत अर्धनग्न अवस्थेत नशा, ड्रग्ज पार्टीचे 'कल्याण कनेक्शन'; नेस्कोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update : नेक्सो सेंटरमधील ड्रग्स पार्टीच्या प्रकरणात एकाला अटक

Nail Colours Designs: उन्हाळ्यात नखांचे सौंदर्य वाढवतील 'हे' 5 नेल कलर्स

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला बनणार ५ राजयोग; या राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

SCROLL FOR NEXT