US President Donald Trump  Saamtv
देश विदेश

इराण करणार अमेरिकेवर हल्ला? रशिया-चीनच्या एण्ट्रीने महायुद्ध भडकणार?

Iran vs USA latest news : इराण-अमेरिका संघर्ष अधिक तीव्र होत असताना रशिया आणि चीन इराणच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. S-400 आणि HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीमसह युद्धसाहित्य इराणमध्ये पोहोचवण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Will Iran attack the United States with support from Russia and China : अमेरिका-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय... अशातच इराण अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे... त्यामुळे अमेरिकेवरील हल्ल्यासाठी इराणच्या मित्रराष्ट्रांनी काय तयारी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

अमेरिकेला न जुमानणाऱ्या इराणवर हल्ला डोनाल्ड ट्रम्प हल्ला करण्याच्या तयारीत आहेत... मात्र त्याच दरम्यान आता इराणच्या समर्थनार्थ रशिया आणि चीनने उडी घेतलीय... इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनींसाठी पुतीन आणि जिनपिंग मैदानात उतरलेत.. एवढंच नाही तर लढाऊ विमानांसह मोठ्या प्रमाणात युद्धसाहित्य इराणमध्ये लँड करण्यात आलंय.... चीन आणि रशियाने अमेरिकेविरोधात कशी रणनीती आखलीय..पाहूयात...

56 तासात 16 लढाऊ विमानांच्या माध्यमातून युद्धसाहित्य इराणमध्ये उतरवलं

इराणला चीनी HQ 9 एअर डिफेंस सिस्टीमचा पुरवठा

रशियाने इराणला S 400 एअर डिफेंस सिस्टीम पाठवली आहे

व्हेनेझुएलाचा घास घेतल्यानंतर ग्रीनलँड, कॅनडा, कुबा, पनामा, मेक्सिकोच नाही तर इराणवर हल्ला करण्याचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांनी आखला होता.. त्यासाठी बी 2 बॉम्बर्स आणि युएस अब्राहम युद्धनौकाही तैनात करण्यात आल्या आहेत... त्यामुळे अमेरिका इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असतानाच आता शत्रूचा शत्रू आपला मित्र याप्रमाणे रशिया आणि चीन इराणच्या मदतीला धावलेत... त्यामुळे युद्धाचा भडका उडाल्यास त्याचा अमेरिकेलाही फटका बसण्याची शक्यता आहे... आणि त्याचाच इशारा इराणचे विदेश मंत्री अब्बास राक्षींनी दिलाय.. अमेरिकेनं हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील... अशी धमकीच इराणने दिलीय..

याआधीही इराण आणि इस्त्रायल यांच्यात भीषण युद्ध रंगलं होत.. मात्र इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमने इस्त्रायलच्या नाकात दम आणला होता... मात्र ऐनवेळी अमेरिकेनं इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला केला...आता परिस्थिती बदलली आहे. इराण युद्धाच्या तयारीत आहे. त्यामुळे अमेरिकेनं हल्ला केला आणि इराणच्या बाजूने रशिया आणि चीन युद्धात उतरल्यास तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Bank Holiday: कामाची बातमी! आजपासून सलग ४ दिवस बँकांना सुट्ट्या; शाळांचं काय? वाचा सविस्तर

Laptop Care Tips : लॅपटॉपची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

IND vs NZ: सूर्याला इशान किशनचा राग का आला होता? सामन्यानंतर भारताच्या कर्णधाराने केला खुलासा

Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; तीन महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं

SCROLL FOR NEXT